मुंबई - मी स्वप्ने पाहणारा नाही. मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहत नाही, पण जबाबदारीपासून दूरही पळणार नाही, असे स्पष्ट करतानाच जनतेने एकदा संधी द्यावी. त्यांच्यावर तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आडमार्गाने का होईना
आपली मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. आज तक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपशी २५ वर्षांपासूनची युती आहे. जागांबाबतची चर्चा योग्य वेळी पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
सीमाभागमहाराष्ट्रात आणू : महायुतीचेसरकार येताच कर्नाटकातील महाराष्ट्राचा भाग पुन्हा राज्याशी जोडला जाईल. महाराष्ट्र वेगळा केला तेव्हा चूक झाली. वाद असल्याने हा भाग केंद्रशासित व्हावा. महाराष्ट्रात आम्ही कोणावर भाषेची सक्ती केली नाही, असेही ते म्हणाले.
मराठीमाणसाच्या झोपड्या नाहीत : आम्हाला प्रांतवादी ठरवले जाते. परंतु भाषावार प्रांतरचना आहे. महाराष्ट्रात रोजगारासाठी लोक येतात ही त्या राज्यांसाठी शरमेची बाब आहे. मराठी परराज्यात काम करतात, पण रस्त्याच्या कडेला झोपड्या बांधत नाहीत, असे उद्धव म्हणाले.
दोन आश्वासने
1. महायुतीचे सरकार येताच सीमाभाग महाराष्ट्राशी जोडला जाईल.
2. आठवीपर्यंत मुलांना टॅब देणार. दप्तराचे ओझे कमी करणार.
भाजपला टोमणे
- मी बाळासाहेबांचा मुलगा. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमागे धावणाऱ्यांतला नाही. मात्र, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार.
- युतीत छोटा भाऊ-मोठा भाऊ असे काहीच नाही. ताकद वाढावी हे प्रत्येक पक्षाला वाटते. त्यात वावगे नाही.
पुढे वाचा, ...तर नक्कीच संधी देऊ : देवेंद्र फडणवीस