आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव नाट्य संमेलनाचा समाराेप उद्धव ठाकरेंच्या हस्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेळगाव येथे हाेणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी असे नामकरण केल्यानंतर अाता संमेलनाचा समाराेप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय संयाेजकांनी घेतला अाहे.

संमेलनाचे उद‌्घाटन मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हाेणार अाहे. ६, ७ अाणि ८ फेब्रुवारी असे तीन दिवस रंगणाऱ्या या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष फय्याज यांची मुलाखतही रंगणार अाहे. समाराेपप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासह अामदार उदय सामंत, अामदार हेमंत पाटील, हेमंत टकले अाणि बेळगावच्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण ठाकूर हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहेत. ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नाट्य संमेलनाचे उद‌्घाटन हाेणार असून विविध नाट्यविषयक कार्यक्रम त्यानंतर ८ फेब्रुवारीपर्यंत रंगणार अाहेत.