आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकधार्जिण्या मेहबुबाशी ज्यांनी संगत केली त्यांनी ममतांच्या भेटीबाबत बोलू नये- उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीचे जोरदार समर्थन केले आहे. - Divya Marathi
उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीचे जोरदार समर्थन केले आहे.
मुंबई- होय, आम्ही ममतांना भेटलो! त्या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि एका पक्षाच्या सर्वेसर्वाही आहेत. पण आम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू–कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे? कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा! पण ज्यांनी पाकधार्जिण्या मेहबुबाशी संगत केली त्यांनी तरी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.
 
मागील दोन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौ-यावर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ममता यांची भेट घेतली होती. यावर भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले. ममता बॅनर्जी या मुस्लिमधार्जिण्या व बांगलादेशी मुस्लिमांना बंगालमध्ये घुसखोरी करून देतात व आपली राजकीय पोळी भाजतात असा आरोप भाजपसह काही उजवे गट करत असतात. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही कडवी हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करते. त्यामुळे भाजपने ममताच्या भेटीनंतर शिवसेनेचे हिंदुत्त्व नकली असल्याची टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी 'सामना'त अग्रलेख लिहून उत्तर दिले आहे.
 
उद्धव ठाकरे सामनाच्या आजच्या अग्रलेखात लिहतात, होय, आम्ही प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आम्ही श्रीमती बॅनर्जी यांना भेटल्याबद्दल कुणाच्या पोटात ढवळाढवळ सुरू झाली असेल तर तो त्यांचा दोष आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावीत होत्या. वाजपेयींच्या सरकारमध्येही त्या होत्याच. वाजपेयी तर त्यांना मुलीसमान मानत होते व ममतादीदींनी प. बंगालात भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवाव्यात असे मोदी व अमित शहा यांचे मनसुबे होते, पण ममता यांनी ते मान्य केले नाही व त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विधानसभा-लोकसभा निवडणुकांत अतिप्रचंड असे यश मिळविले. ममता बॅनर्जी यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असतील व शिवसेनेच्या विचारधारेशी जुळणाऱ्या नसतील, पण शिवसेनेने ज्यांच्याशी सातत्याने लढे दिले त्या ‘लालभाईं’ना प. बंगालातून समूळ नष्ट करण्याचे काम ममता व त्यांच्या तृणमूल काँग्रेसनेच केले आहे, असे सांगत ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केला हल्लाबोल....
बातम्या आणखी आहेत...