आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Slam Bjp & Modi Over Pakistan Invitation

लोकांना मोदींकडून खूप अपेक्षा, पाकला जशास तसे उत्तर द्या- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या धोरणावर टीका केली आहे. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भेटीबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या धोरणावर टीका केली आहे.
मुंबई- पाकिस्तान देश आपल्या सीमेवरील जवानांना रोज मारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. पहिल्याप्रमाणेच (काँग्रेस शासन काळ) आताही तेच घडत आहे. मात्र, मोदींत जशास तसे उत्तर देण्याची धमक आहे, ते त्यांनी दिले पाहिजे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदींना लगावला आहे.
पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौ-यावर आहेत. तेथे आज सकाळी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. या दोन्ही देशादरम्यान ब-याच मुद्यांवर आज सहमती झाली. मोदी-शरीफ यांची नियोजित 45 मिनिटांची बैठक तब्बल दीड तास चालली. यावेळी शरीफ यांनी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले. मोदींनी ते निमंत्रण स्वीकारले. 2016 साली पाकिस्तानात सार्क परिषद होत आहे. या परिषदेचे व पाक भेटीचे मोदींनी शरीफ यांच्याकडून निमंत्रण स्वीकारले. दोन्ही देशांनी याचे स्वागत केले. मात्र, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मोदी-शरीफ भेटीवर नाराजी व्यक्त करीत मैत्रीचा हात पुढे करण्याची काँग्रेसप्रमाणेच चूक करू नका असा सल्ला दिला. खासदार संजय राऊत यांनी मोदी-शरीफ भेटीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तासाभरातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्याच सरकारचा पाढा पुढे वाचला जाणार असेल तर काही उपयोग नाही. आपला शत्रू रोज काहींना काही कुरापती काढून आपल्याला बेजार करीत आहे आणि आपण त्यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे करण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसने हेच केले. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे लोकांना बदल होईल अशी अपेक्षा आहे. पण तसे काही होताना दिसत नाही. मोदींकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. जशास तसे उत्तर देण्याची त्यांच्यात धमक आहे. ते त्यांनी केले पाहिजे नाहीतर लोकांचा अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजप व मोदींना लक्ष्य केले.
पुढे वाचा, अमित शहांच्या स्वबळाच्या भाषेवर उद्धव काय म्हणाले....