आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी परदेशात भारताची बदनामी करून टाळ्या मिळवतात- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतातील भ्रष्टाचारावर, आपल्या उणिवांवर आपल्याच देशात बोलावे, आपल्या देशात जे विरोधक आहेत त्यांच्यावर येथेच हल्ले करावेत. सोनिया, राहुल यांच्यावर टीका करण्यासाठी युरोप, अमेरिकेत जाण्याची गरज नाही. काही झाले तरी या भूमीवर आम्ही एक आहोत. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी भारत ही एक ‘अनडिव्हायडेड फॅमिली’ आहे आणि हीच वज्रमूठ आपण जगाला दाखवायला हवी. स्वदेशातील यंत्रणेवर झोड उठवून देश-विदेशात तोंडपाटीलकी करीत यथेच्छ बदनामी करून जे लोक हशा व टाळ्या मिळवत आहेत त्यांनाही देशभक्तीचे धडे नव्याने द्यावे लागतील, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशाच्या दौ-यावर आहेत. विविध देशात मोदी यांनी निरनिराळी वक्तव्ये केली आहेत. यावरून मोदींवर टीकेचे झोड उठली आहे. अमेरिकेत कोणार्क मंदिराबाबत मोदींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्याआधीही दोहा येथे त्यांनी भारताबाबत एक वक्तव्य केले होते. त्यामुळे मोदींच्या वक्तव्याबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त करीत परदेशात देशाची बदनामी न करण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त याबाबत अग्रलेख लिहून मोदींना झोडपले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, आमच्या देशातील घाण परकीय भूमीवर गुलाल म्हणून उधळणे देशाच्या प्रतिमेस चिखल फासणारे ठरू शकते. ‘आमच्या देशाला भ्रष्टाचाराने वाळवीसारखे पार पोखरून टाकले आहे,’ असे पंतप्रधान मोदी यांनी परकीय भूमीवर म्हणजे दोहा येथे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधानांनी स्वदेशाविषयी दोहा येथे असे सांगणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन करण्यासारखेच आहे. चार भारतीय एकत्र आले की ते एकतर क्रिकेटवर बोलतात, सिनेमावर बोलतात नाहीतर भ्रष्टाचारावर बोलतात, अशी पुरवणी माहिती पंतप्रधानांनी परकीय भूमीवर दिली आहे. भारतात भ्रष्टाचार कसा होतो त्याचे गमतीदार किस्से सांगून पंतप्रधानांनी उपस्थितांच्या हशा व टाळ्या मिळवल्या. थोडक्यात, भारत हा भ्रष्टाचाराने बरबटलेला देश असून तो साफ करण्यासाठी आम्ही मोठ्या मोहिमा राबवत असल्याचे पंतप्रधानांनी परकीय भूमीवर जाहीर केले आहे. कुणी चीनमध्ये, तर कुणी युरोपात जाऊन तोंडपाटीलकी करीत असेल तर ते बरोबर नाही. देशातल्या गोष्टी देशातच राहाव्यात, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींना सुनावले आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरे यांनी मोदींवर कशा शब्दांत केला आहे हल्लाबोल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...