आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतमातेचा अवमान करणा-यांचे नागरिकत्व काढा, ओवेसींची गर्दन कायद्याने उडवा- उद्धव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- खासदार खासदार असदुद्दीन ओवेसींने महाराष्ट्रात येऊन भारतमातेचा अपमान, देशद्रोह केला आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही अशी गरळ बुधवारी विधानसभेत ओकली. या आमदारमहाशयांना अधिवेशनकाळापर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने मंजूर केला. त्यामुळे त्यांच्यासारख्या मुस्लिम धर्मांधांचे फूत्कार थांबतील असे नव्हे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, बेशक काढून घ्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'द्वारे केली आहे.
आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी ‘भारतमाता की जय’ असे कधीच बोलणार नाही अशी बांग खासदार असदुद्दीन ओवेसीने चार दिवसापूर्वी लातूरात ठोकली होती. यावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ओवेसींना राज्यसभेत जोरदार उत्तर दिले. ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर शिवसेनेनेही आपले मुखपत्र 'सामना'त यावर अग्रलेख लिहून ओवेसी व त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, आजच्या काळातील मुस्लिमांचे स्वयंभू पुढारी बनलेल्या ओवेसीसारख्या मुसलमानांना ‘भारतमाता की जय’ म्हणायला यातना होत आहेत. तिरंग्याचा अनवधानाने अपमान झाला म्हणून गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला व तो आजही तुरुंगात आहे. महाराष्ट्रात येऊन असदुद्दीन ओवेसीने भारतमातेचा अपमान करून देशद्रोहच केला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य व मुख्यमंत्री आहे तरी लातुरात भारतमातेचा अपमान होऊनही ओवेसी लातुरातून सहीसलामत सटकला. सिंधुदुर्गात उपोषणास बसलेल्या आमदारांना पोलिस फोडून काढतात, पण त्याच महाराष्ट्रात देशद्रोहाचा गुन्हा करून ओवेसी सरकारवर थुंकून सहीसलामत बाहेर पडतोच कसा कसा याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने ओवेसींवर कशा शब्दांत केला आहे हल्लाबोल..
बातम्या आणखी आहेत...