मुंबई- जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्व जलसाठे सुकले आहेत. मान्सूनची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते माणसे जगवण्यासाठी वापरणे हाच एकमेव पर्याय आहे. पाण्याऐवजी बियर ढोसण्याची
आपली संस्कृती नाही. बाटली बंद पाणी विकत घेऊन तहान भागवण्याचीही ऐपत दुष्काळात होरपळणार्या शेतक-यांची नाही. बिअर कंपन्यांना पाणी मिळालेच पाहिजे असा घोषा भाजपच्या मराठवाड्यातील मंत्र्यांनी लावला ही त्यांची भूमिका झाली. आधी माणसे जगवा ही लोकभावना आहे. आज तीच गरज आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडेंना सुनावले आहे.
ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी बीडमध्ये पिण्यासोबतच उद्योगांना व दारू कंपन्यांना आरक्षित पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. यावरून पंकजा मुंडेंवर चोहोबाजूंनी टीका झाली. मात्र, पंकजा मुंडे आजही आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'त 'दारू की पाणी?' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून आधी माणसे जगवा असे खडसावले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, भयंकर दुष्काळ आणि पाण्यासाठी वणवण असल्याने आयपीएल क्रिकेटचे सामने न्यायालयाने महाराष्ट्राबाहेर घालवले आहेत. क्रिकेटच्या मैदानांवर मारण्यासाठी जे पाणी लागते ते आणायचे कुठून? असे उच्च न्यायालयाने विचारले व शंभर कोटींचा महसूल बुडवून हे सामने राज्याबाहेर नेले. पण आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी दौर्यात हॅलिपॅडसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी केल्याचे प्रकरण समोर आले. ज्या लातुरात सगळ्यात जास्त पाणीटंचाई आहे तिथेच हॅलिपॅड करण्यासाठी पाण्याची नासाडी झाली. अर्थात हॅलिपॅडसाठी वापरलेले पाणी पिण्याचे नव्हते तर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी होते, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. मग क्रिकेटच्या मैदानावरही जे पाणी हिरवळ राखण्यासाठी वापरले जाणार होते ते तरी कुठे पिण्याचे होते? तरीही सध्या सरकार चालवणार्या न्यायालयाने क्रिकेटचे सामने महाराष्ट्राबाहेर घालविले. यातील काही सामने छत्तीसगढ येथील रायपूर येथे आयोजित केले, पण छत्तीसगढ येथील‘दुष्काळ’ व पाण्याची टंचाई महाराष्ट्रापेक्षा भयंकर असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र तेथील हायकोर्टाने अद्याप तरी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी रायपूरचे आयपीएल क्रिकेट सामने त्यांच्या राज्याबाहेर हाकलून दिलेले नाहीत, असे सांगत कोर्टाच्या निर्णयाला टोला लगावला आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरेंनी भाजप व पंकजांना कशा शब्दांत सुनावले आहे...