आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Slam To Modi\'s Followers In Saamana

मोदींना \'देवत्व\' बहाल करू नका, \'इंडिया शायनिंग\'प्रमाणे डाव उलटेल- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी मोदींची अनेक ठिकाणी अशा प्रकारची मंदिरे उभारली आहेत. - Divya Marathi
नरेंद्र मोदींच्या समर्थकांनी मोदींची अनेक ठिकाणी अशा प्रकारची मंदिरे उभारली आहेत.
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम व नेतृत्व सक्षम आहे. देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्याची धमक त्यांच्यात आहे. मात्र, मोदी हे देवाचे अवतार असल्याची विधाने करून समर्थकांनी त्यांना दैवी मखरात बसवले आहे. सत्तेत सर्वोच्चपदी असलेल्या व्यक्तींबाबत असा उदो उदो होतच असतो. तसेच देवत्व दिले की त्यांचे उत्सव, मंदिर वगैरे विषय ओघानेच आले. पण मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना आणि यशाचा प्रचार व्हायला हवा यासाठी देशभरातील राज्यांत, जिल्ह्यांत, गाव पातळीवर हे यश दिसायला हवे म्हणून काही योजना सरकारला सुचविण्यात आल्या आहेत. शिवाय या योजनांना पंतप्रधानांचे किंवा अन्य राष्ट्रीय नेत्यांचे नाव देण्यात येणार आहे. कोणत्याही चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी मोदी सरकारच्या यशाचे चित्र पडद्यावर साकारणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या यशावर आठवड्याला एक चित्रपट (माहितीपट) माहिती व प्रसारण खाते बनवेल व चित्रपटगृहात मुख्य चित्रपट सुरू होण्यापूर्वी हा चित्रपट दाखवला जाईल, अशी माहिती मोदींचे समर्थक व केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.
याद्वारे मोदींचा उदो उदो करण्याचेच प्रयत्न होणार आहेत. ही एक प्रकारची एकाधिकारशाही असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. नेमके याच मुद्यावर बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त यावर अग्रलेख लिहून 2004 साली भाजपवर 'इंडिया शायनिंग' जसे बुमरॅंग झाले तसेच या प्रयोगातून होईल अशी भीती वजा इशारा उद्धव यांनी दिला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांचे काम व नेतृत्व सक्षम आहे. देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकण्याची धमक त्यांच्यात नक्कीच आहे, पण मोदी यांच्या यशाची चित्रे दाखविण्याची ही वेळ खरोखरच आहे काय? हा प्रयोग ‘शायनिंग इंडिया’प्रमाणे उलटू शकतो. मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी आहे. त्यामुळे या गोष्टी पाचव्या वर्षातच शोभून दिसतील. आता विरोधकांना टीकेला जागा कशाला देता व हे सर्व कशासाठी करता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे वाचा, इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीचा उल्लेख करून मोदी व त्यांचे समर्थक त्याच मार्गावर जात आहेत- उद्धव ठाकरे...