आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Slams Sharad Pawar\'s Statement

ज्यांनी आयुष्यभर गंडेच घातले त्यांना बंधन काय कळणार- उद्धवची पवारांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्यांनी आयुष्यभर फक्त लोकांना गंडवलेच त्यांना गंडा, धागे-दोरे यातील बंधन काय कळणार? असे प्रत्त्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. बरं झाले या निमित्ताने शरद पवारांच्या मनातील विष बाहेर आले असे ठाकरेंनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेने शिवबंधनाचा कार्यक्रम करून शिवसैनिकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ गुरुवारी दिली होती. हा प्रकार म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली करणारा आहे, असे सांगत पवारांनी ‘प्रबोधनकारांनी आयुष्यभर पुरोगामी विचार मांडताना बुवाबाजी, गंडेदोरे यांना विरोध केला होता. नुकताच राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा मंजूर झाला असून गंडेदो-यांवर राज्य सरकार काय कारवाई करते याकडे माझे लक्ष लागले आहे,’ अशी खोचक टिप्पणी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी आज एक छोटे निवदेन काढून पवारांवर हल्लाबोल केला.
निवेदनात उद्धव यांनी म्हटले आहे की, ज्या माणसाने आयुष्यभर फक्त लोकांना गंडेच घातले व गंडवले त्यांना आमच्या शिवबंधन व धागे-दोरेचे काय कळणार. उद्या ते रक्षाबंधन पण करू नका असे म्हणतील. जर असे काही झाले तर सरकारने जो जादूटोणा कायदा पारित केला आहे त्याला तोडून-फोडून टाकू. पण बरं झाले या निमित्ताने शरद पवारांच्या मनातील विष बाहेर आले असे म्हटले आहे.
उद्धव म्हणजे ‘तू लढ, मी कपडे सांभाळतो’, वाचा पुढे...