आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत जास्त पाऊस पडतो, त्याला मुंबई महापालिका जबाबदार कशी?; उद्धव ठाकरेंचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत जास्त पाऊस पडतो, त्याला मुंबई महापालिका जबाबदार कशी?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व चांगले काम केले आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पावसाळा पाणी न तुंबता जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 
कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. आरजे मलिश्काने एका गाण्याद्वारे बीएमसीच्या कारभारावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्याला उत्तरही दिले. पण आज खुद्द उद्धव यांनाच याविषयावर बोलावे लागले आहे.
 
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहाचे मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नूतनीकरण करण्यात आले. आदर्श दर्जाच्या सुविधा असलेले नवे कालिदास नाट्यगृह हे देशातले सर्वोत्तम नाट्यगृह ठरेल, असा विश्वास या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवे कालिदास नाट्यगृह हे मुंबईतील सर्वोत्तम कलाकृती असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आपला इतिहास आणि संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे. कालिदास नाट्यगृहाच्या निमित्ताने ही जपणूक होत आहे. आता कालिदास जवळ एखादे कलादालन सुरू करण्याबाबतही विचार केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळायला हवी, असे ते म्हणाले.
 
मुंबईमध्ये कापड उद्योगाशी संबंधित संग्रहालय उभारण्याची योजना आहे. या संग्रहालयात मुंबईसाठी तसेच देशासाठी कष्टांच्या रुपात मोठे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांचे आयुष्य कसे आहे हे दाखवण्याची आवश्यकता उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. कालिदास नाट्यगृहाच्या निमित्ताने पालिकेकडून मुंबईसाठी केल्या जात असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला.