आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा धंदा कुडमुडे ज्योतिष सांगणार्‍या पोपटाचा - उद्धव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : वांद्रे पूर्व भागातील जाहीर सभेत उपस्थितांना तलवार उंचावून अभिवादन करताना उद्धव ठाकरे. शेजारी उमेदवार तृप्ती सावंत व आदित्य ठाकरेंसह इतर.)
मुंबई - ‘मुंबई महापालिका निवडणूक येताच भाजप-शिवसेनेचे युती सरकार कोसळणार, अशी भविष्यवाणी करणार्‍या शरद पवारांचा हा कुडमुडे ज्योतिष सांगणार्‍या पोपटाचा धंदा आहे. सत्ता नसल्याने त्यांनी हा नवा धंदा सुरू केला असून त्यांच्या लुडमुड्या ज्योतिषाने युती सरकावर मुळीच परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्षे तर चाललेच, पण पुढील बरीच वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेत येऊ देणार नाही,’ असा जोरदार पलटवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उद्धव यांनी शरद पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. मंगळवारी याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारात पवार यांनी ही ‘भविष्यवाणी’ केली होती.

‘बाळासाहेबांची शिवसेना ही मर्दांची होती. त्यांच्या वारसांमध्ये मात्र ही धमक दिसत नाही,’ असे बोलणार्‍या पवारांना आजही मी साहेबच म्हणतो. पण बाळासाहेबांचेच त्यांनी नाव घेतले असेल तर सांगतो की, ते पवारांना ‘बारामतीचा म्हमद्या’ तसेच ‘मैद्याचे पोते’ म्हणत. मी तसे कधीही म्हटलेले नाही आणि मुख्य म्हणजे मर्द ओळखण्यासाठी मर्दच लागतो, असा टोलाही उद्धव यांनी मारला.

‘मातोश्री’च्या अंगणात राणेंना मूठमाती!
नारायण राणे म्हणतात की मी ‘मातोश्री’च्या अंगणात चाल करून आलो आहे. पण वांद्र्याचे मतदार याच ‘माताेश्री’च्या अंगणात त्यांना मूठमाती देण्याचे काम ११ एप्रिलला करणार आहेत. कुडाळमध्ये वैभव नाईकांनी त्यांना चितपट केले. त्यांच्या मुलाला विनायक राऊत यांनी माती चारल्यानंतर ते आता ‘मातोश्री’च्या अंगणात उसने अवसान आणून लढायला आले आहेत. पण जनता त्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव म्हणाले.

घरे पेटवू नका, चुली पेटवा : ‘एमआयएम’च्या ओवेसी बंधूंनी आक्रमक विचार मांडून मुस्लिम बांधवांची घरे पेटवण्याचे काम करू नये. त्यांच्यात एवढीच हिंमत असेल तर त्यांनी या समाजाच्या चुली पेटवाव्यात. मला हैदराबादमध्ये येऊन दाखवावे, असे आव्हान देणार्‍या ओवेसींना मी एवढेच सांगतो की हैदराबाद पाकिस्तानात नाही तर हिंदुस्थानात आहे. मला माझ्या देशात अडवण्याची कोणातही हिंमत नाही,’ असेही उद्धव यांनी ठणकावले.
पुढे वाचा, शिवसेनेत येणार होते राणे...