आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Today May Speak Against BJP In Dasara Melava

दसरा मेळाव्यात उध्‍दव ठाकरे मारणार भाजपवर ‘बाण’, यंदा मेळावा भव्यच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुवर्णमहोत्सव साजरा करत असलेल्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा गुरुवारी शिवाजी पार्कवर होत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपबद्दल काय भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव हे हिंदुत्वाचा मुद्दा ठासून मांडणार असून त्याआडूनच भाजपवर शरसंधान साधणार आहेत.
पर्यावरणमंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने यंदाचा मेळावा भव्यच होईल. राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंतचा सगळ्यात भव्य मेळावा होणार आहे.