आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Warning To All In Saamana\'s Editorial

आम्हाला जो नडेल, तो मातीत सडेल- उद्धव ठाकरेंचा \'सामना\'तून इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा’ ही मातोश्रीची ताकद आहे. ‘प्रेम’ करणा-यांसाठी, श्रद्धा व निष्ठेची पूजा करणा-यांसाठी ‘मातोश्री’चे अंगण आहे तर अंगावर येणा-या बेइमानांसाठी ते ‘रणमैदान’ आहे. याच मैदानात नारोबा राणे यांना पुन्हा एकदा गाडून विजयाचा भगवा झेंडा शिवसेनेने फडकवला आहे. नारोबांना आधी त्यांच्याच मालवण-कुडाळात चीतपट केले व आता वांद्य्रात त्यांचे साफ पानिपत केले असे सांगत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जो नडेल तो मातीत सडेल असा इशारा दिला आहे.
नारायण राणेंचा वांद्रेत दारूण पराभव केल्यानंतर सामनातून उद्धव ठाकरे काय बोलतील याबाबत उत्सुकता होती. आजच्या सामनात मातोश्रीचे तडाखे अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहून शिवसेनेने नारायण राणेंसह गद्दारी करणा-यांना जो द्यायचा तो योग्य संदेश सामनातून दिला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेस आव्हान देणारे त्यांच्या कर्माने नष्ट झाले व चांगल्या कर्माने शिवसेना तरली आहे. राणे यांचा निकाल लागला तसा हैदराबादी ‘ओवेसी’ पिलावळीचाही सुपडा साफ झाला. निजाम व रझाकाराच्या औलादीसही वांद्य्राच्या भूमीत लोकांनी गाडले व मुसलमान समाजही ‘ओवेसी’च्या मागे गेला नाही. ‘मातोश्री’च्या अंगणात काय होईल? असे आडाखे बांधले जात होते, पण सर्व आडाखेबाजांना मातोश्रीचे तडाखे काय असतात ते समजले असेल. नारोबांसारख्या लोकांचा पराभव शिवसेना कोणत्याही मैदानात करू शकते. कारण शिवसेनेचे इमान हे जनतेशी व महाराष्ट्राशी आहे. शिवसेनेच्या विरोधात कोणी कितीही वल्गना व गर्जना केल्या तरी शिवसेनेच्या ढाण्या वाघासमोर भल्याभल्यांना पड खावी लागते. त्यामुळे राणे वगैरे तर किस झाड की पत्ती? ही पत्तीही आता सुकल्या पाचोळ्यासारखी उडून गेली, अशी टीका अग्रलेखात केली आहे.
पुढे वाचा, नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी काय इशारा दिला आहे...
काँग्रेसने स्वत:चेच वस्त्रहरण करून घेतले- उद्धव ठाकरे...