आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Warns Bjp Leadership On Raj Thackeray Issue

धरसोड वृत्ती सोडा नाही तर \'एनडीए\'तून बाहेर पडू, उद्धव यांचा भाजपला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसेला महायुतीसोबत घेण्याचा विषय केव्हाच संपलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सारख्या मिन्नतवा-या करू नका. यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. याचा फटका आगामी निवडणुकांत भोगावा लागेल. राज ठाकरे हे प्रकरण लवकर संपवा नाहीतर आम्ही एनडीए बाहेर पडू, अशी धमकी शिवसेनेने भाजप नेतृत्त्वाला दिल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे. नितीन गडकरी आहे ती महायुती जास्तीत जास्त जागा कशी जिंकेल किंवा सत्तेवर कशी येईल यासाठी प्रयत्न न करता जे विषय चघळून झाले आहेत त्याचाच विचार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले असताना गडकरी कधी शरद पवारांची स्तुती करीत आहेत तर कधी राज ठाकरेंची भेट आहेत. यामुळे आपल्या मतदारांत सभ्रमांचे वातावरण होण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असेल निघालेल्या मार्गावरून चालावे लागेल, अन्यथा यांचे 'परिणाम' भोगावे लागतील, अशी धमकीवजा इशारा दिला आहे.
राज आणि गडकरी यांची काल दुपारी मुंबईत एका पंचतारांकित भेट झाली. यात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, सेनेला कसे अडचणीत आणता येईल यावर चर्चा झाल्याचे कळते. भाजपात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे हा वाद जुना आहे. मुंडे हे शिवसेनेच्या जवळ आहेत तर गडकरी हे नेहमीच राज यांच्या बाजूने बोलत राहिले आहेत. मुंडे यांचे मातोश्रीवर नाते प्रमोद महाजन यांच्या काळापासून घट्ट आहे. बाळासाहेब आणि महाजन यांची 1985 पासून राजकीय मैत्री होती. त्यामुळे मुंडेही मातोश्रीच्या जवळ गेले विश्वासास पात्र ठरले. त्यामुळे मुंडे आजही राज ठाकरे व मनसेबाबत खूप सावध बोलतात व भूमिका घेतात त्याउलट गडकरी राज यांच्याबाबत स्पष्ट बोलतात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी अगली कालसुद्धा गडकरींवर शरसंधान साधले. शिवसेना-भाजप-रिपाइंसह इतर सर्वच घटकपक्ष एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार जर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या करील तर त्याला जनता माफ करणार नाही. भाजपमधून कोणी सत्ताधारी नेत्यांवर स्तुतिसुमने उधळत असेल तर त्याला भाजपमधील कम्युनिकेशन गॅप कारणीभूत टोला उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना लगावला होता.
सोमवारी दुपारी झालेल्या राज-गडकरी लंच भेटीनंतर सेनेने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांना तत्काळ मातोश्रीवर हजर होण्यास सांगितले. तसेच भाजपची अधिकृत भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्यास सांगितले. यावर भाजप पक्षाची व प्रदेश पातळीवरून याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याचे सांगितले. गडकरी हे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करू शकत नाही. मात्र भाजप तुम्हाला व महायुतीतील सर्व नेत्यांना विचारात घेतल्याशिवाय काहीही निर्णय घेणार नाही. तसेच तुमची भूमिका मी राष्ट्रीय पातळीवर सांगेन असे आश्वासन फडणवीस यांना उद्धव यांना दिले. फडणवीस मध्यरात्री मातोश्रीवर दाखल झाले होते.