आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray Will Meet Governor C Vidyasagar Rao Today

महसूलमंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्या; उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आज दुष्काळाच्या दुष्टचक्रात होरपळत आहे. त्यासाठी विशेष अधिकाराचा वापर करून केंद्राकडून तातडीची मदत मिळवून द्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. राज्यपाल महोदयांनी राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करावा व राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळाबाबत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा आदी मागण्यांही उद्धव यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने केल्या. उद्धव यांनी आज राजभवनावर राव यांची भेट घेतली. उद्धव यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 15 आमदार उपस्थित होते. उद्धव यांनी दुष्काळाच्या भीषण वास्तव्याचा अहवालही राज्यपालांना सादर केला.
मराठवाड्यात 260 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून दुष्काळाच्या अस्मानी संकटसमयी शेतकर्‍यांना मदत करण्याची नितांत गरज आहे. मराठवाड्यात दुष्काळाची कुर्‍हाड कोसळली आहे, तर उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. चारापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरे कशी सांभाळायची ही चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. या स्थितीशी माहिती घेण्याकरिता व शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी नाशिक जिल्हा आणि मराठवाड्यात भेटी दिल्या. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस शिवसेनेच्या 63 आमदारांसह मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या घरी जाण्याबरोबरच शेतात जाऊन करपलेल्या पिकांचे भीषण वास्तव पाहिले. शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकल्या. अपुर्‍या सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि मायेचा आधार दिला.

दुष्काळाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍याला मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करून असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करावा आणि शेतकर्‍यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत मिळवून द्यावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची 4 वाजता राजभवनात भेट घेतली.
25 हजार कोटींची मदत करण्याची शिवसेना करणार मागणी... वाचा पुढे...