आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackeray\'s Photography Exhibition After 11 Years, For A Social Cause

PHOTOS: उद्धव ठाकरेंची छायाचित्रे पुसणार दुष्काळग्रस्त शेतक-यांचे अश्रू...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन 7 ते 12 जानेवारीदरम्यान मुंबईतील जहांगीर कलादालनात आयोजित केले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रेक्षक- रसिकांना हा आविष्कार पाहायला मिळेल.
उद्धव ठाकरे यांनी गेली 11 वर्षे आपल्या व्यस्त राजकीय प्रवासातून वेळ काढत छंद म्हणून केलेल्या फोटोग्राफीद्वारे क्षण टिपले आहेत. छंद, कला म्हणून काढलेल्या या फोटोग्राफी चित्राद्वारे हे प्रदर्शन रसिकांना आनंद देणार असले तरी यातून राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांचे अश्रूही पुसले जाणार आहेत. प्रदर्शनातील काही निवडक प्रकाशचित्रांची विक्री केली जाणार असून त्यातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतक-यांना, आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. प्रदर्शनात एकूण 70 छायाचित्रे असतील. त्यातील निवडक छायाचित्रांची विक्री करून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात रसिकांना उद्धव यांनी कॅनडाच्या बर्फातील हिमअस्वलांची टिपलेली दुनिया, समाजातील प्रथितयश महनीय व्यक्तींच्या कळत नकळत टिपलेल्या भावमुद्रा, कंबोडियातील मंदिरांची कहाणी आणि यासोबतच ‘इन्फ्रारेड’ छायाचित्रणाचा ‘विज्ञान-कला’विष्कार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी जंगलातील वन्यजीव, छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या गडकोट किल्ल्यांची कहाणी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेली ‘वारी’... उद्धव ठाकरे यांच्या कॅमेर्‍याने अनेक संवेदना टिपल्या आहेत आणि जहांगीरमध्ये उसळलेल्या कलारसिकांच्या गर्दीला अमाप आनंद मिळवून दिला आहे. आता 11 वर्षानंतर रसिक प्रेक्षकांना उद्धव यांनी पुन्हा एकदा जहांगीरमध्ये छायाचित्रांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.
पुढे वाचा, उद्धव यांचे काय म्हणणे या प्रदर्शनाबाबत व शेतक-यांच्या मदतीबाबत. तसेच पाहा उद्धव यांनी टिपलेली काही खास छायाचित्रे....