आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना@50: उद्धव ठाकरेंच्या या मुलाला तुम्ही ओळखता, जाणून घ्‍या काय करतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे म्हणजे एक अजब रसायनच. या घराण्याला कलेची, प्रतिभेची आणि नेतृत्वगुणांची देणगीच लाभलेली आहे. पुढील पिढी हा वारसा पुढे नेत आहे. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे, तर आदित्य ठाकरे यांना काव्य रचन्‍याचा छंद, उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हे राजकारणापासून लांब असले तरी, त्‍यांनाही जंगल, झाडे आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करण्याचा छंद आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेला येत्या रविवारी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्‍त आम्‍ही आपल्‍याला सांगत आहोत तेजस ठाकरे यांच्‍याविषयी..
नवीन खेकड्यांची नोंद..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा चिरंजीव तेजस याने सिंधुदुर्गातील आंबोली घाटात खेकड्याच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्‍या होत्‍या. ते दूर्मिळ प्रजातीच्या सापांचा अभ्यास करण्यासाठी कोकणात गेले होते. त्यांच्यासोबत वन्यजीव अभ्यासकही होते. या सर्वांना दुर्मिळ साप काही आढळले नाहीत. मात्र सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात रघुवीर घाटात वाहणाऱ्या धबधब्यात खेकड्यांच्या काही प्रजाती मात्र सापडल्या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा फोटो, जाणून घ्‍या तेजस यांच्‍याविषयी..
बातम्या आणखी आहेत...