आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिराप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीही लाल फितीत, हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव यांचा घणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अकोल्‍यातील शेतकरी आंदोलन व आगामी हिवाळी अधिवेशनाच्‍या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्‍हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'अयोध्येतील राममंदिराप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्तीही लाल फितीत व घोषणाबाजीतच अडकून पडली आहे. त्यामुळे सरकारने तोंडास पुसलेल्या पानासह हवालदिल होऊन शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. यशवंत सिन्हा हे झारखंडमधून विदर्भात आले व त्यांनी आंदोलन केले. ते कधीच लोकनेते नाव्‍हते. तरीही शेतकरी मोठ्या संख्‍येने त्यांच्या मागे उभा राहिला. भाजप व सरकारसाठी ही धोक्‍याची घंटा आहे', असा इशारा त्‍यांनी भाजपला दिला आहे.  

 

आंदालन मागे घ्‍या म्‍हणून धावपळ का करावी लागली?
शिवसेनेच मुखपत्र 'सामना'च्‍या संपादकीयमधून उद्धव यांनी भाजपवर हल्‍लाबोल चढवला आहे. ते म्हणाले, 'यशवंत सिन्हा हे भाजपमधील ‘टाकाऊ’ व ‘बिनकामाचे’ नेते आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे. मग सिन्हा यांना विदर्भात इतका पाठिंबा का मिळाला? चंद्रकांत पाटलांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व मंडळींना त्‍यांची मनधरणी का करावी लागली?' 11 डिसेंबरपासून नागपूरमध्‍ये हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. या आंदोलनाचा भडका उडण्‍याच्‍या भितीमुळे व आगामी हिवाळी अधिवेशनात याचे फटाके फुटू नये म्‍हणून राज्‍यकर्त्‍यांनी धावपळ करावी लागली, असे उद्धव म्‍हणाले.


आम्‍ही शेतक-यांबरोबरच
यशवंत सिन्हा यांच्याशी आमचीही दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. प्रश्न शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा आहे व याप्रश्नी सरकारात वगैरे आहोत व सत्तेचे काय होणार याची फिकीर न करता शिवसेनेने सर्वात प्रथम लढ्याचे रणशिंग फुंकलेच आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय फायद्या-तोट्याचा विचार न करता आम्ही सिन्हा यांना पाठिंबा दिला होता. अखेर सरकारने त्‍यांच्‍या मागण्‍या पूर्ण करण्‍याचे आश्‍वासन दिले व सिन्‍हा यांनी आंदोलन मागे घेतले. कर्जमाफीप्रमाणे या आश्‍वासनांच्‍या अंमलबजावणीची गत होऊ नये. अकोल्‍यातील शेतक-यांचा उद्रेक वेळीच समजून घेऊन आश्‍वसनांची पूर्तता केली पाहिजे. या आंदोलनाद्वारे थापा मारुन व टोप्‍या घालून फार काळ राजकारण करता येत नाही हेच शेतक-यांनी सांगितले आहे व आम्‍ही शेतक-यांबरोबर आहोतच, असे उद्धव म्‍हणाले.     

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मागण्या मान्य झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांना करंजी भरवताना एक शेतकरी व आंदोलनाबद्दलची इतर माहिती...

 

बातम्या आणखी आहेत...