आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत योगी, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार; शिवसेना पक्षप्रमुखांकडून फडणवीस सरकार लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. ते सोडवले नाही तर शेतकऱ्यांना हातात शस्त्रे घ्यावी लागतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. उत्तर प्रदेशात योगी सरकार तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार अशी बोचरी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुधवारी केली. पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानचे तुकडे पाडणार असाल तर शिवसेना तुमच्या पाठीशी असेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर हल्ला करावा असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. 
 
राज्यातील सरकारमध्ये राहूनही माेदी व फडणवीस यांच्यावर टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे साेडत नसल्याचा अनुभव बुधवारी पुन्हा एकदा अाला.
 
वांद्रे येथे रंगशारदा सभागृहात बुधवारी शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांकरिता तीनदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. जवानांच्या नृशंस हत्येबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काश्मीर पेटले आहे. पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करत आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने  फाशीची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी हल्ले वाढले आहेत. काश्मीरमध्ये तर जवानांवर दगडफेक होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानचे तुकडे पाडणार असाल तर शिवसेना तुमच्या पाठीशी असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
 
मध्यावधी उद्या कशाला, आजच घ्या
पक्ष मजबूत करण्याचे स्वप्न बघताय, देश मजबूत करण्याचे  स्वप्न कधी बघणार? असा सवाल भाजपला करत उद्धव म्हणाले, नरेंद्र मोदी आमचे दुश्मन नाहीत. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी आत्ताच का? मध्यावधी उद्या कशाला, आजच घ्या आम्ही तयार आहोत.
 
ईव्‍हीएमवर आक्षेप 
- लोकशाहीचा अधिकार ईव्‍हीमने हिरावला, असे म्‍हणत उध्‍दव यांनी ईव्‍हीम मशिनबद्दल आक्षेप नोंदवला. तसेच भाजपला निवडणुकीत मिळणाऱ्या दणदणीत विजयावरही प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले. 

सर्जिकल स्‍ट्राईक
- एका सर्जिकल स्‍ट्राईकने पाकिस्‍तान सुधारणार नाही. पाकिस्‍तानमध्‍ये घुसून पाकला अद्दल घडवा. पाकचे तुकडे पाडा. शिवसेना तुमच्‍या पाठिशी उभी राहिल, असे आवाहन उध्‍दव यांनी केंद्र सरकारला केले. 
- मंगळवारीच उध्‍दव यांनी 'मन की बात नव्‍हे तर आता गन की बात केली पाहिजे.', असे म्‍हणत मोदींवर निशाणा साधला होता. 
 
मध्‍यायवधी निवडणूका
- मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार आहे. उद्या कशाला आताच निवडणुका घ्‍या, असे उध्‍दव म्‍हणाले.    
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...