आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव काय पाकमध्ये साजरा करायचा का? उद्धव ठाकरेंचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘गणेशोत्सव भारतात नाही तर काय पाकिस्तानात साजरा करणार का,’ असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याचे आवाहन केले. रविवारी गणेशोत्सव समन्वय समिती आणि महापालिकेच्या बैठकीत ते बाेलत हाेते.

ठाकरे म्हणाले, उत्सव हा थाटातच साजरा झाला पाहिजे. रस्त्यावर बसून नमाज पढणाऱ्यांच्या विरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांच्या विरोधात मात्र आपलेच लोक न्यायालयात जातात. गणेशोत्सव हा टिळकांनी सुरू केलेला आहे, तो दाऊदचा उत्सव नाही’, असा चिमटाही त्यांनी काढला. गणेश मंडळांवर टीका करण्यापूर्वी त्यांचे सामाजिक काम पाहण्याचा सल्लाही ठाकरेंनी दिला. गणेशोत्सव दणक्यातच झाला पाहिजे आणि त्यासाठी शिवसेना मंडळांच्या पाठीशी असल्याची ग्वाही उद्धव यांनी दिली.

शहा, पवारांचा समाचार
कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.

दिल्लीकडे लक्ष द्यावे
‘मुंबईत एका दिवसात तीनशे मिलिमीटर पाऊस पडला तर मुंबई तुंबणार नाही का?’ असा सवाल करत मुंबईच्या नालेसफाईवर चिंता व्यक्त करणाऱ्यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावे, तिथे सत्ता कोणाची आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. त्यांच्या या टोलेबाजीमुळे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील एकमेकांविरोधातील शेरेबाजीला ऊत येण्याची चिन्हे आहेत.