आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thackery Reaction On Sharad Pawar Comments

लवासाची किंवा धरणात मुतण्याची कल्पना सुचली नाही- उद्धव यांचा पवारांना टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परदेशात गेल्यावर आम्हाला नवीन कल्पना सुचतात हे खरे आहे, पण दुष्काळग्रस्तांना पाणी देता येत नाही म्हणून कोरड्या धरणात मुतून दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडविण्याची कल्पना आम्हाला सुचली नाही, असा जबरदस्त टोला शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना हाणला.

उद्धव ठाकरे परदेशात गेले की त्यांना नवनव्या कल्पना सुचतात. आताही ते परदेशात आहेत. तिथून आणखी एखादा प्रस्ताव घेऊन येतील, अशी टीका शरद पवार यांनी उद्धव यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना उद्धव म्हणाले, परेदशात गेल्यावर आम्हाला नव्या कल्पना सुचतात हे खरे आहे. कारण आम्हाला चांगले पाहण्याचा, चांगला विचार करण्याचा व महाराष्ट्राच्या हितासाठी या कल्पना राबविण्याचा वारसा लाभला आहे. आमच्या कल्पना या देशहिताच्या व लोकहिताच्याच असतात. आम्हाला शेतक-यांच्या जमिनीवर लवासा बांधण्याच्या कल्पना सुचत नाहीत, अशी खरमरीत टीका पवारांवर केली.

उद्धव पुढे म्हणाले, रेसकोर्सवरचा जुगार पाहून शरद पवारांना आयपीएलची कल्पना सुचली. आम्हाला वाटले होते की, पवारांना शिवाजी महाराजांच्या घोड्याचा अभिमान असेल. पण त्यांना रेसकोर्सवरच्या घोड्याचा अभिमान आहे हे ऐकून वाईट वाटले. रेसकोर्सने खूप वर्षे घोडेबाजार पाहिला. आता त्याजागी सामान्य माणसाला श्वास घेण्यासाठी मोकळी जागा राहू द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.