आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uddhav Thackreay Demands Strict Action Against Gang Rape Criminals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामूहिक बलात्‍कारातील आरोपींची धिंड काढा : उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सामूहिक बलात्काराचे प्रकरण हे माणुसकीला व मुंबईला लाज आणणारे आहे. यावर राजकीय चर्चेचे फड न रंगवता पोलिसांना तपासात सहकार्य करा. तसेच पोलिसांनी या आरोपींची धिंड काढावी, अशा शब्दांत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव म्हणाले, महाराष्‍ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण ढासळल्याचा हा पुरावा आहे. वांद्रे रेल्वेस्थानकावर एका तरुणीवर अ‍ॅसिड फेकले होते, त्यात तिचा मृत्यू झाला. अद्याप त्यातील आरोपी मिळाले नाहीत. दोन दिवसांपूर्वी रेल्वेत अमेरिकन महिलेवर हल्ला झाला. काल हे बलात्काराचे प्रकरण घडले.

आरोप- प्रत्यारोप नकोत
मुंबईत महिला अत्याचाराच्या आजवर घडलेल्या सर्वच घटना संतापजनक आहेत. मात्र, ही वेळ पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची असून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. पोलिसांनी सर्व आरोपी पकडावे आणि त्यांची धिंड काढावी. तरच पोलिस व कायद्याची जरब राहील, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.