आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव-देवेंद्र आधी हसले मग बरसले; पुणे-पिंपरीत प्रचारसभेत एकमेकांविरोधात डागली तोफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांनी साेमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमधले राजकीय वातावरण ढवळून निघाले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात तोफ डागली. पण तत्पूर्वी मुंबईहून आलेल्या या दोन्ही नेत्यांची काही क्षणांची भेट पुण्याच्या विमानतळावर झाली. त्या वेळी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करण्याचे सौजन्यही दोघांनी दाखवले.  

फडणवीस यांनी साेमवारी पुण्यात एकापाठोपाठ चार मॅरेथॉन सभा घेतल्या. ठाकरे यांची एकच सभा पिंपरीत झाली. ‘भाजप ही राष्ट्रवादी कांग्रेसची बी टीम अाहे,’ असा अाराेप ठाकरे यांनी केला. तर ‘आमचा मित्रपक्ष सत्तेसाठी कुठे काँग्रेससोबत तर कुठे ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी करत अाहे,’ असा आरोप फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. दोन्ही नेत्यांच्या सभांना नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.  

फडणवीस यांनी शिवसेनेवर जास्त टीका करण्यात वेळ दवडला नाही. पुण्याचे प्रश्न आणि उपाययोजनांची जंत्री त्यांनी मांडली. ‘तुम्ही मला पुण्यात भाजपचा महापौर द्या, मी तुम्हाला स्वप्नातले पुणे देतो,’ असे आश्वासन त्यांनी दिले. ‘पंतप्रधान मोदी यांचे पुण्यावर प्रेम आहे. माझ्याही अजेंड्यावर पुणे आहे. मात्र जोपर्यंत महापालिकेत भाजपची सत्ता येत नाही, तोपर्यंत विकसित पुणे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. पुढील पाच  वर्षात पुण्याला नेमके कोठे घेऊन जायचे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. गेल्या पंधरा वर्षांत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेसाठी काही केले नाही. त्यामुळे शहरांचा बकालपणा वाढला. हे चित्र बदलण्यासाठी भाजपला सत्ता द्या,’ असे आवाहन त्यांनी केले.

पुढील स्लाइडवर वाचा... उद्धव ठाकरे म्हणाले, मित्राें... म्हटलं की लाेक अाता घाबरतात!

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...