आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यास मार्ग मोकळा; उद्धव ठाकरेंचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'शेतक-यांनीच क्रांतीची ठिणगी ठाकली. त्‍यामुळे कर्जमाफीची घोषणा झाली. यापुढे लढण्‍याची वेळ येऊ नये. अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत शेतकरी सरकारने दिलेल्‍या हमीला जागेल. अन्‍यथा शिवसेना सत्‍तेची परवा करणार नाही', अशा शब्‍दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
 
मंगळवारी पुणताब्‍यांतील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे मातोश्रीवर भेट घेतली. यशस्‍वी लढ्याबद्दल त्‍यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांबद्दल शिवसेना अजूनही आक्रमक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
 
मला सातबारा कोरा पाहिजे  
- मला 'तत्‍वत:' वगैरे ही सरकारची भाषा कळत नाही. शब्‍दांच्‍या खेळात मला पडायच नाही. मला शेतकऱ्यांची सामान्‍य भाषा समजते. मला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा पाहिजे.
 
शिवसनेमुळे संप यशस्‍वी
- या लढ्याचे सर्व श्रेय शेतकऱ्यांच्‍या एकजुटीला जाते. शिवसेनेन या संपाला उघड पाठिंबा दिला. म्‍हणून संप यशस्‍वी झाला. कर्जमाफीची घोषणा झाली. पण अजून अमंलबजावणी बाकी आहे. आमच अंमलबजावणीवर लक्ष आहे.

... तर सत्‍तेची परवा नाही
- वेळेत कर्जमाफीच्‍या निर्णयाची अंमलबजावणीची झाली नाही तर आम्‍ही सत्‍तेची परवा करणार नाही. अजूनही शिवसेनेन 'मी कर्जमुक्तं होणार' हे शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं अभियान बंद केलेलं नाही. त्याच्या वेळापत्रकात थोडा बदल केलांय. माझा शेतकर्यांशी संवाद सुरूच रहाणार.
 
यावेळी पत्रकारांनी मध्‍यावधी निवडणुकांबद्दल प्रश्‍न विचारला असता, 'कर्जमुक्ति होऊद्यात मग बघू पुढचं पुढे', असे उत्‍तर ठाकरे यांनी दिले.
 
महसूलममंत्री चंद्रकांत पाटील घेणार उद्धव ठाकरेंची भेट
बुधवारी संध्‍याकाळी 6 वाजता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. बैठकीत 'कर्जमुक्तीचे निकष आणि अंमलबजावणी' यासंदर्भात चर्चा होणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...