आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thakceray Attacks On Modi shah In Saamana

मोदींचे ब्रह्मास्त्र बुमरॅंग, केजरीवाल जिंकले मग हरले कोण? उद्धव यांचा भाजपला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाही असे भाजपच्या लोकांना वाटते. जर हा पराभव नरेंद्र मोदींचा नाही तर मग तो नक्की कोणाचा? केजरीवाल जिंकले, मग हरले कोण? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व पर्यायाने मोदी-शहा जोडगोळीला विचारला आहे. राजकारणात कधीच काही चिरंतन नसते याचे जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा सल्लाही उद्धव यांनी पक्षाचे मुखपत्र 'सामना'तून भाजपला दिला आहे.
देशाची राजधानी दिल्लीचे मंगळवारी निकाल लागले. यात सत्ताधारी भाजपचा दारूण पराभव झाला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी केजरीवालांचे जाहीर अभिनंदन करताना भाजपला डागण्या दिल्या होत्या. उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहांना कालच निकालानंतर अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. भाजपने शिवसेनेला जी वागणूक दिली त्याची भडास उद्धव यांनी कालच्या निकालानंतर काढली. त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव भाजपवर कोणत्या शब्दात हल्लाबोल करतात याकडे लक्ष होते. त्यानुसारच उद्धव यांनी मोदींना व शहांना दिल्लीतील पराभवाबाबत जबाबदार धरले आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, देशाच्या राजकारणात खळबळ माजविणारा निकाल दिल्लीने दिला आहे. देशाचे मन हेच दिल्लीचे मन असल्याचे म्हटले जाते. दिल्लीने विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने मन मोकळे केले आहे. दिल्लीकर जनतेने ‘आप’च्या केजरीवाल यांचा झाडू हातात घेऊन भाजपचा कचरा केला. भारतीय जनता पक्ष दोन आकडी संख्या तर सोडा, एका हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्या जागाही मिळवू शकलेला नाही. याचे खापर फक्त किरण बेदींवर फोडून चालणार नाही. ज्या केजरीवाल यांना ‘भगोडा’ आणि ‘पळपुटा’ म्हणून प्रचाराचा मुद्दा बनवला त्याच केजरीवाल यांच्या पाठीशी दिल्लीची जनता का उभी राहिली? पंतप्रधान मोदी यांचे वास्तव्य आता दिल्लीतच असते, पण इतक्या जवळ असूनही यावेळी मोदी यांचे ब्रह्मास्त्र चालले नाही. अमित शहा यांची निवडणूक जादू चालली नाही. दिल्लीचा निकाल हा अनेक अर्थांनी लागलेला अनेकांचा निकाल आहे, असे सांगत मोदी-शहांची जादू यापुढे देशात चालणार नाही असे अप्रत्यक्ष सुचविले.
पुढे आणखी वाचा, उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांना जोडताना भाजपवर कसा हल्लाबोल केला व केजरीवालांचे कोणत्या शब्दात कौतुक केले...