आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू असणे हाच अपराध, हिंदू राज्यकर्तेच हिंदूंचे सगळ्यात मोठे दुश्मन- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. या देशात हिंदू असणे हा जणू अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. यासाठी हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्ववादाची डरकाळी फोडली आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मदतीने भारतात मोठे हल्ले करून भारताला धडा शिकवला जाईल. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण भारतात शरीयत कायदा लागू करू असे अशी भाषा नुकतीच इसिसने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त यावर कसे होणार हिंदूचे या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. आपले (हिंदू) राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. यासाठी हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल, असे अग्रलेखात भूमिका मांडली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्या खाली पडत असतात. नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘इसिस’ किंवा अन्य दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारची धमकी येथील मुसलमानांच्या बाबतीत वा अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते. मुसलमानांच्या वा ख्रिश्‍चनांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा गर्जना सरकारी पातळीवर झाल्या असत्या व अल्पसंख्याक म्हणून या लोकांच्या सुरक्षेसाठी चिंतामय उसासे टाकण्याची राष्ट्रीय स्पर्धाच लागली असती, असे सांगत देशातील तमाम राष्ट्रप्रेमी व तथाकथित धर्मनिरपेक्ष वाद्यांवर शिवसेनेने हल्लाबोल केला आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरेंनी भाजप-पीडीपी युतीवरून भाजपवर कशा शब्दांत केला हल्लाबोल...
बातम्या आणखी आहेत...