आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uddhav Thakeray Critics On Ncp Head Sharad Pawar

हाफीज सईदप्रमाणे शरद पवार काहीही गरळ ओकू लागलेत- उद्धव यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बेताल बडबड करून बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पुण्यातल्या खुनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मोदींवर खापर फोडून पवार स्वत:चेच हसे करून घेत आहेत. हाफीज सईदप्रमाणे त्यांनी वाट्टेल तशी गरळ ओकू नये व स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये, असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.
फेसबुकवरील महापुरुष विटंबना प्रकरणाने हिंसक वळण घेतले व त्यातून पुण्यातील एका निरपराध तरुणाची हत्या झाली. झाला प्रकार भयंकर व मानवतेला कलंक लावणारा आहे. सर्व संशयित आरोपी हिंदू राष्ट्र सेना नामक संघटनेचे आहेत. मात्र, यावर भाष्य करताना शरद पवारांनी म्हटले होते की, ‘‘दिल्लीत मोदींचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातील अशा शक्तींनी डोके वर काढले आहे व त्यांची हिंमत वाढली आहे.’’ यावरूनच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे. आजच्या सामनातील अग्रलेखात पवारांची तुलना पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदबरोबर करून जबरी टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार हे कधी काय बोलतील याचा नेम नाही. महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर त्यांचा ताळतंत्र सुटला आहे. महाराष्ट्रात एक हत्या झाली. त्यात मोदी सरकारचा काय संबंध? राज्यात पवारांचे राज्य आहे. गृहमंत्री त्यांच्या पक्षाचा आहे. म्हणजे अशी हत्या होणे हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे.
उद्धव यांनी शरद पवारांसह जितेंद्र आव्हाडांवरही केली सडकून टीका, वाचा पुढे...