आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटूंबीक सहल सोडून उद्धव ठाकरे जाणार माेदींच्या भेटीला; पंतप्रधान निवासस्थानी स्नेहभाेजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपशी असलेले टाेकाचे मतभेद तूर्त बाजूला ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साेमवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अायाेजित केलेल्या स्नेहभाेजनासाठी दिल्लीला जाणार अाहेत. विशेष म्हणजे अापली काैटुंबिक विदेश सहल रद्द करून ठाकरेंनी माेदींचे हे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

राष्ट्रपतिपदासाठी सर्वसहमतीने उमेदवार ठरवण्याच्या उद्देशाने भाजपने १० एप्रिलला पंतप्रधान निवासस्थानी ‘रालाेअा’ घटकपक्षांचे स्नेहभाेजन ठेवले अाहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उद्धव ठाकरेंना फाेनवरून निमंत्रण दिले हाेते. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजपत निर्माण झालेल्या तणावामुळे ठाकरे निमंत्रण स्वीकारतील का याबाबत शंका हाेत्या. त्यातच खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवल्याशिवाय शिवसेना स्नेहभाेजनाला जाणार नसल्याचा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...