आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्याच्या नेतृत्वाचा निर्णय महायुतीच्या बैठकीतच, उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगला असताना आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असे दावे करून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात तेल ओतले होते. परंतु मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महायुतीच्या बैठकीतच घेतला जाईल, अशी नरमाईची भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादावर तूर्तास पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिका-यांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव यांनी वरील भूमिका जाहीर केली. शिवसेनेच्या बैठकीनंतर ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते.

ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी बुधवारी तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वक्तव्याने भाजपसह महायुतीच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र ठाकरे यांच्या भूमिकेमुळे ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री या तत्त्वाशी आता शिवसेनाही सहमत झाल्याचे दिसते.