आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यावर रोज आरोप होताहेत तरी, मुख्यमंत्री अजिबात दमणार नाहीत- उद्धव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस... - Divya Marathi
फाईल फोटो- उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस...
मुंबई- महाराष्ट्रात रोज एका मंत्र्यावर आरोप होत आहेत व मुख्यमंत्र्यांना त्यांचा बचाव करावा लागत आहे. राज्य सरकार हे नीती, न्याय व साधनशुचितेच्या मार्गावरूनच चालले आहे व मुख्यमंत्र्यांची अजिबात दमछाक होणार नाही, हे आरोप करणा-यांनी पक्के ध्यानात ठेवावे. विदर्भाचा हा गडी यापैकी कोणत्याही प्रकरणात मातीला पाठ लावणार नाही. महाराष्ट्राला एक समर्थ मुख्यमंत्री मिळाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांवर गंभीर आरोपांचा भडिमार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक झाली आहे. रोज एका मंत्र्यावर आरोप होत आहेत व मुख्यमंत्र्यांना त्यांचा बचाव करावा लागत आहे. मात्र, कोणत्याही घटनेत तथ्य आढळून येत नसल्याने फडणवीसांनी आपल्या सहका-यांची पाठराखण केली आहे. याचाच संदर्भ घेत शिवसेनेचे मुखपत्र सामनात आज अग्रलेख लिहून फडणवीस यांच्या सामजस्य भूमिकेवर उपरोधिक भाष्य केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, नैतिकता व साधनशुचिता हाच संघ परिवाराचा प्राण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सतत नैतिकता, सदसद्विवेकबुद्धी, साधनशुचिता, स्वच्छ आणि पारदर्शक कारभार या शब्दांवर अजिबात गंज चढू देत नाही. हे शब्द घासूनपुसून चकचकीत ठेवण्यासाठी ही मंडळी पराकाष्ठा करीत असली तरी दिल्लीत आणि महाराष्ट्रातही याच शब्दांची खाजकुजली त्यांच्या सर्वांगावर पडली आहे. रोज एका मंत्र्यावर आरोप होत आहेत. फक्त वर्षभरातच हे फटाके कसे फुटू लागले, हा संशोधनाचा विषय आहे. कोणी माहिती लपवून ठेवली तर कोणी आपल्या खात्यात गैरव्यवहार केल्याची प्रकरणे उसळून वर आली आहेत. लोणीकर व तावडे यांच्या पदवी प्रकरणाचा वाद विरोधकांना एखाद्या अस्वलाप्रमाणे गुदगुल्या करीत आहे. मुळात ही पदवी प्रकरणे बाहेर काढली कोणी? अमुकतमुक मंत्र्याच्या ‘पदव्या’ बनावट आहेत हे बाहेरच्यांना कसे समजले? म्हणजे ही नाजूक आणि गोपनीय बाब चव्हाट्यावर आणून मंत्र्यांना अडचणीत आणणारे त्यांचेच निकटवर्तीय असले पाहिजेत!, अशी शंका अग्रलेखात उपस्थित केली आहे.
पुढे वाचा, पंकजा मुंडेंबाबत काय म्हटले सामनाच्या अग्रलेखात...
बातम्या आणखी आहेत...