आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना यापुढेही बाळासाहेबांच्या मार्गानेच पुढे जाईल. शिवसेनेत मी बेबंदशाही येऊ देणार नाही, असे स्पष्ट करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर कडाडून टीका केला. दोन्ही पक्ष बोके असून त्यांचा लोण्याच्या गोळ्याप्रमाणे शिवसेनेवर डोळा आहे. परंतु, शिवसेना हा लोण्याचा गोळा नसून तोफेचा गोळा आहे, हे त्यांनी विसरु नये, असा इशारा उद्धव यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही तोफ डागली. पाकिस्तानचा मंत्री चुकून आपल्याकडे गृहमंत्री झाल्यासारखे वाटत आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीन भागांमध्ये ही सविस्तर मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेपुढील आव्हानांसाठी सज्ज असल्याचे सांगातना उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेना सावरली आहे. ती जर सावरली नसती तर पाकिस्तानी हॉकीपटुंना आम्ही परत पाठवले नसते. आपण जे म्हणतोय की आजही बाळासाहेब आपल्यामध्ये आहेत म्हणजे काय? तर आमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये बाळासाहेब आहेत. बाळासाहेब आजारी होते तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो, पण त्यांनी त्याही परिस्थितीत एक खरमरीत निवेदन देऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध केला होता. त्यावेळेलाच त्यांनी तो आदेश दिलेला आहे. त्यामुळे आता नवा आदेश काय? म्हणून शिवसैनिक विचार करीत नाही बसले. जेव्हा पाकिस्तानी संघ मुंबईत आला व तो सराव करू लागला तेव्हा त्यांना परत पाकिस्तानात पाठविण्याचे काम हे फक्त शिवसैनिकांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.