आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरे झाले शिवसेनेचे \'पक्षप्रमुख\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेच्‍या अध्‍यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्‍यात आली आहे. शिवसेनेचे 'पक्षप्रमुख' हे पद निर्माण करण्‍यात आले असून त्‍यावर उद्धव यांची निवड करण्‍यात आली. शिवसेनेच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीची आज मुंबईत शिवसेना भवनात बैठक झाली. त्‍यावेळी हा प्रस्‍ताव एकमताने मंजूर करण्‍यात आला.

गजानन किर्तीकर यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्‍या अध्‍यक्षपदाचा प्रस्‍ताव मांडला. त्‍यास दिवाकर रावतेंनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने मंजूर करण्‍यात आला. तसेच शिवसेनाप्रमुख हे पदही गोठविण्‍यात आले आहे. कार्याध्‍यक्ष हे पद रद्द करण्‍यात आले आहे. शिवसेनाप्रमुख हे केवळ बाळासाहेब ठाकरेच होते. या पदावर दुसरा कोणीही बसू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यामुळे 'पक्षप्रमुख' हे पद निर्माण करण्‍यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्‍हेंबर 2012 मध्‍ये निधन झाले होते. त्‍यानंतर आज त्‍यांच्‍या जयंतीला उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्‍या अध्‍यक्षपदी औपचारिक निवड करण्‍यात आली. याशिवाय आदित्‍य ठाकरे यांनाही शिवसेनेमध्‍ये नेतेपद देण्‍यात येणार आहे.