आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhao Thackeray Went On Back Foot Over Issue Of Narendra Modi After Call From Rajnath Singh

मोदींवर टीकाः राजनाथ सिंहांच्‍या दूरध्‍वनीनंतर उद्धव ठाकरेंची सारवासारव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तराखंडमध्ये अडकलेल्या गुजराती बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाचवल्याच्या घटनेवर अग्रलेखातून टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी बॅकफुटवर जात सारवासारव केली. परंतु, अग्रलेखातून मोदींवर हल्‍लाबोल करणा-या उद्धव ठाकरेंनी माघार का घेतली, यासंदर्भात राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भाजपचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी दूरध्‍वनीवरुन समज दिल्‍यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव केली. ही टीका नसून मोदींकडून अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगून त्यांनी घुमजाव केले.

रालोआतील मित्रपक्ष शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून मोदींवर टीका केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी उमटली. त्यामुळे उद्धव यांना ही सारवासारव करावी लागल्याचे बोलले जाते. शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नरेंद्रभाई आमचे आहेत. आमच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत. त्याच आम्ही अग्रलेखातून व्यक्त केल्या. त्यांच्यावर टीका केलेली नाही, नरेंद्रभाईंवर टीका करण्यासाठी आम्हाला कोणीही अडवलेले नाही, असा खुलासाही उद्धव यांनी केला. मोदींनी केलेले काम चांगलेच आहे. यात्रेला जाणारे सगळे हिंदूच आहेत. गुजरातीही हिंदूच आहेत. सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मोदींसारखे काम केले पाहिजे. त्यात राजकारण आणता कामा नये. अग्रलेखाचा राजकीय अर्थ काढू नये. मोदी यांच्याबाबतच्या बातम्यांमध्ये माध्यमांनी संकुचितपणा आणू नये, असे सांगून उद्धव म्हणाले की, आमचे मोदींशी वैर असण्याचे काही कारणच नाही, त्यामुळे त्यांना विरोध करण्याचेही कारण नाही.

राजनाथ सिंह यांनी दूरध्‍वनीवरुन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. नरेंद्र मोदींबाबत कोणतीही टीका खपवून घेतली जाणार नाही, अशी खंबीर भूमिका त्‍यांनी घेतल्‍याचे समजते.

काय टीका केली होती मोदींवर? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...