आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Udhav Meeting To Governor For The Racecours Land

रेसकोर्सवरील उद्यानाबाबत उद्धव राज्यपालांना भेटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रेसकोर्सवर जागतिक दर्जाचे उद्यान बांधण्याचा आराखडा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख राज्यपालांची भेट घेणार आहेत. रेसकोर्सची लीज न वाढवता तेथे उद्यान बांधावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे केली जात आहे. ठाकरे यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.


अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब, दीनानाथ कला दालन आणि पर्जन्य जल संचयनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे व मुंबईचे महापौर सुनील प्रभू उपस्थित होते. रेसकोर्स येथे उद्यान बनवावे, अशी मागणी शिवसेना करीत असून याबाबत एक संकल्पचित्रही तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना संकल्पचित्र दाखवण्यात आले असून, राज्यपालांची लवकरच वेळ घेऊन त्यांना भेटणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.