आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी विकिपीडियावर किमान एक पान तरी लिहा : तावडे, साहित्य संमेलनाचा समाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाेंबिवली - ‘यंदाचा मराठी भाषा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी  तसेच इंटरनेटवर मराठीला प्राधान्य मिळण्यासाठी प्रत्येकाने मराठी विकिपीडियावर किमान एक पान तरी  मराठीत लिहिले पाहिजे,’ असे अावाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांनी रविवारी डाेंबिवलीत सुरू असलेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले.  दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मात्र कार्यक्रमास अनुपस्थिती हाेती.

महाराष्ट्राला युनिकोड सदस्यांच्या रांगेत स्थान मिळाले आहे. त्यामुळे माहितीच्या महाजालात मराठीचा प्रसार करण्याची गरज असल्याचे सांगून तावडे पुढे म्हणाले की, ‘मराठी साहित्याचा अनुवाद  विदेशी भाषेत होण्याची गरज आहे. रवींद्रनाथ टागोरांना मिळालेला नोबेल पुरस्कार हा त्याचाच एक भाग होता.  राज्य  शासनाने गेल्या काही महिन्यापासून अनुवादासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. साहित्य मंडळाच्या माध्यमातून त्याला गती देता येऊ शकेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सेलिब्रेटी, राजकीय स्वागताध्यक्ष नसताना हे संमेलन यशस्वी करणे कठीण असते पण गेल्या तीन दिवसात ते यशस्वी करून दाखवल्याबद्दल तावडे यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.
 
जाेशींना भाषा संवर्धनासाठी पुरस्कार
मराठी भाषा संवर्धनासाठी आपण दोन वेगळे पुरस्कार सुरू केले. यंदा भाषा अभ्यासक पुरस्कार बदलापूर येथील शामराव जोशी यांना देण्यात येणार असल्याचे तावडे म्हणाले. कोणतीही कला ही राजाश्रीत नव्हे राजपुरस्कृत असली पाहिजे.  त्याच भूमिकेतून आम्ही आमचे कर्तव्य करतोय. इथे मांडलेल्या ठरावांवरील अंमलबजावणीसाठी नक्कीच कार्यवाही करू, असे आश्वासनही सांस्कृतिक कार्यमंत्री  विनोद तावडे यांनी दिले.
 
पुस्तक गाव साकारणार
गेल्या वर्षीच्या मराठी साहित्य संमेलनात  पुस्तकाच्या गावाची घोषणा केली होती. त्यानुसार  वाईजवळ (जि. सातारा) एका गावात  पुस्तक गाव  उभारण्याची आखणी पूर्ण झाली असून लवकरच ते प्रत्यक्षात येईल.  या गावात लाखो पुस्तकं असतील आणि पर्यटक पुस्तकं वाचण्यासाठी त्या गावात जातील, अशी अाशा विनाेद तावडे यांनी व्यक्त केली.
 
युतीच्या चर्चा याच व्यासपीठावर करू
‘संमेलनाचे व्यासपीठ हे यंदा मनोमिलनाचे व्यासपीठ असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढच्या वेळी युतीच्या चर्चा याच व्यासपीठावर करू,’ असे सांगून तावडे यांनी मंत्रिपदाच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
 
 
पुढील स्लाइडवर वाचा... साहित्य संमेलनात मांडण्यात आलेले प्रमुख ठराव...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...