आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई्त युतीसाठी उद्धव- CM अाग्रही; BJP ला 80 ते 100 जागा देण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभा निवडणुकीत युती ताेडल्यामुळे वितुष्ट निर्माण झालेले तरीही राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले मित्रपक्ष शिवसेना भाजप पुढील वर्षी हाेणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक मात्र गेल्यावेळप्रमाणे युतीनेच लढविण्याच्या तयारीत अाहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती अाहे.

दाेन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळाची कितीही अाग्रही मागणी हाेत असली तरी काेणतीही ‘रिस्क’ घेण्याची तयारी नसल्याने ठाकरे फडणवीस मात्र युतीलाच प्राधान्य देत असल्याचे सध्या तरी चित्र अाहे. प्राथमिक चर्चेत शिवसेना भाजपला ८० ते १०० जागा देण्यास तयार असल्याचेही सांगितले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेशी युती करण्यास उत्सुक आहेत. स्वबळावर निवडणुका लढवल्या तरी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता येणे अवघड असल्याची जाणीव त्यांना अाहे. सन २०१२ मध्ये शिवसेनेसाेबत युतीत असूनही मुंबई मनपात भाजपला केवळ ३१ जागा मिळाल्या हाेत्या. अाता वेगळे लढून जास्त जागा आल्या तरी सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेचाच पाठिंबा घ्यावा लागेल. अाणि या ‘गणिता’त काही गडबड झाली अाणि शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर राज्यातील सरकारही अडचणीत येऊ शकते. त्यामुळे ही ‘रिस्क’ घेण्यापेक्षा युतीनेच मनपा निवडणुकीला सामाेरे जावे, असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील सर्व वॉर्डांचा प्राथमिक सर्व्हे केला अाहे. त्यात भाजपाला ८० जागा देता येऊ शकतात, असा त्यांचे मत अाहे. गेल्या निवडणुकीत युतीच्या जागावाटपात ६३ दिलेल्या भाजपने त्यापैकी ३१ जागी विजय मिळवला हाेता. अाता भाजपची ताकद वाढली अाहे, त्यामुळे वाटाघाटी सुरु झाल्यानंतर हा आकडा १०० पर्यंत जाऊ शकतो. तरीही उद्धव ठाकरे युती करण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले जाते. युतीचे नक्की झाल्यानंतर जागा वाटपाची चर्चा करण्यात येणार आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांच्या होकारावरच भाजपचा युतीबाबत निर्णय अवलंबून असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सन २०१२ मध्ये मुंबई मनपा निवडणुकीस शिवसेना, भाजप रिपाइं महायुतीने सामाेरे गेले हाेते. एकूण २२७ वाॅर्डांपैकी शिवसेनेने १३५, भाजपा ६३ आणि रिपाइंने २९ जागा लढवल्या हाेत्या. त्यात शिवसेनेचे ७५, भाजपचे ३१ आणि रिपाइंचा एकच नगरसेवक निवडून आला हाेती. महायुती सत्तेवर आली होती. त्या वेळी शिवसेनेला १०,०५,६८३ आणि भाजपाला ३,९७,७९७ मते मिळाली होती.
बातम्या आणखी आहेत...