आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई महापौर निवडणूक 8 मार्चला, शिवसेना-काँग्रेस युती होऊ नये म्हणून भाजपची खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजपमध्येे रस्सीखेच सुरू असलेल्या मुंबईचा महापौर निवडीसंदर्भात ठरलेली ९ मार्च तारीख बुधवारी नाट्यमय बदलली. काँग्रेसची मदत घेऊन शिवसेनेने महापौर बसवू नये म्हणून भाजपने ९ एेवजी ८ मार्चला ही निवडणूक घेण्यासाठीची खेळी यशस्वी करून दाखवली.  
 
८ मार्च रोजी उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान आहे. किमान त्या दिवसापर्यंत तरी मुस्लिम मतदार नाराज होऊ नयेत या भीतीपोटी काँग्रेस मुंबईत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, अशी भाजपची अटकळ आहे. शिवसेना मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसला तटस्थ राहावयास सांगून शिवसेना स्वत:चा महापौर निवडेल, अशी भाजपला शंका वाटते. त्यामुळे तारीख नाट्यमयरीत्या बदलण्यात आली.  

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार दुपारी पालिका आयुक्तांना भेटले अाणि प्रशासनाने लागलीच महापौरपदाच्या तारखेत बदल केला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मात्र या प्रक्रियेवर अाक्षेप नाेंदवला अाहे. तारीख बदलण्यासाठी मनपा आयुक्तांवर  राज्य सरकार दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला अाहे.  खरे तर  महापौर निवड ठरल्याप्रमाणे ९ मार्च रोजी होईल, असे दुपारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले. मात्र पालिका चिटणीस विभागाने शिवसेनेची ही मागणी धुडकावली. 

विद्यमान महापालिका सभागृहाची मुदत ८ मार्चपर्यंत आहे. त्या दिवशी मावळते नगरसेवकही सभागृहात येतील अाणि गोंधळ होईल. त्यामुळे ९ मार्च रोजी निवडणूक घ्यावी, असे कारणही शिवसेनेकडून देण्यात आले होते. मात्र अाठ मार्च या तारखेवर महापालिका प्रशासन ठाम राहिले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... महापालिकेतील पक्षीय बलाबल

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...