सत्ता आल्यावर सर्वांचे हिशेब चुकते करू; राणेंचे नाव घेता उद्धव ठाकरेंचा इशारा
प्रतिनिधी | Update - Nov 27, 2013, 05:50 AM IST
‘आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर या सर्वांचे हिशेब चुकते करू,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख मंगळवारी नारायण राणे यांचे नाव न घेता दिला.
-
कणकवली- ‘आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्याशिवाय राहणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर या सर्वांचे हिशेब चुकते करू,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख मंगळवारी नारायण राणे यांचे नाव न घेता दिला.कणकवली येथे रविवारी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्टय़े व अनेक शिवसैनिक जखमी झाले होते. तसेच जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनाही अटक झाली होती. या सर्वांची भेट घेण्यासाठी उद्धव मंगळवारी कणकवलीत आले होते. या वेळी ते म्हणाले की, गृहमंत्री आर. आर. पाटील हे केवळ तोंडाचा डबा वाजवतात. शिवसैनिकांना मारहाण करणार्या पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांची तत्काळ बदली करण्याची धमक त्यांनी दाखवावी. कॉँग्रेस नेत्यांच्या इशार्यावरूनच ही मारहाण करण्यात आली. या सर्वांची काळी यादी आम्ही तयार केली असून, सत्तेवर आल्यावर त्यांचा हिशेब चुकता करू,’ असा इशाराही त्यांनी दिला.आजवर कोकणात केवळ एकाच कुटुंबाचा विकास झाला, अशी टीका त्यांनी राणेंचे नाव न घेता केली. ‘आमचा लढा कोकणच्या विकासासाठी आहे. जखमी शिवसैनिकांना उपचारासाठी गोव्यात न्यावे लागले. कोकणात साधे रुग्णांवर उपचार होत नाहीत. या भागाच्या विकासासाठी माता-भगिनींनी लढय़ात सहभागी झाले पाहिजे,’ असेही उद्धव म्हणाले.