आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसलमानी मतांची नवी \'पेढी\', \'सामना\'तून शिवसेनेने घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील वादग्रस्त व्यंंगचित्राप्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. व्यंगचित्रातून कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, मुसलमानी मतांचीनवी 'पेढी' या शीर्षकाखाली शिवसेनेने 'सामना'च्या ‍अग्रलेखातून भाजपवर आज खरमरीत टीका केली आहे. सामन्यातील अग्रलेखानेे पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

'मुसलमानांना गाठीशी बांधून राजकारण करणार्‍यांची एक नवी ‘पेढी’ निर्माण झाली व त्यात राममंदिराचा कळस उतरला हेच आता दिसते. मुसलमान हा देशाचा सदासर्वदा दुश्मन नाही, पण हिंदूंना त्यांच्यामुळे त्यांच्याच हिंदुस्थानात मान-अधिकार मिळत नाही व सरकारे बदलली तरी मुसलमानी लांगूलचालनाचे नवे प्रयोग घडतच आहेत. मुसलमानांना मिठ्या मारा असे मोदी यांनी सांगताच त्यांचे शब्द जिभेवर विरघळण्याआधीच मुसलमानी मोर्चाचा बॉम्ब फुटावा, हे कसले लक्षण समजायचे?' असा खोचक सवाल शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे 'विराट रुप' सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मोर्चांतून प्रेरणा घेऊन मुसलमान समाजानेही त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चे काढण्याचे ठरवले आहे. मुसलमानांनी मोर्चे काढावेत व आपल्या मागण्यांसाठी हैदोस घालावा, हे काही आपल्या देशाला नवीन नाही. पण पंतप्रधान मोदी यांनी कोझीकोड येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलेल्या भाषणात मुस्लिमांना आपलेसे करण्याचा संदेश देताच मुसलमानांनी हिरव्या लुंग्या सावरून मोर्चाची तयारी करावी हा काय निव्वळ योगायोग समजावा? असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'सामना'तील अग्रलेखात आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...