आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आया-बहिणींसमोर झुकण्यात लाज कसली, \'व्यंगचित्र\'वादावर उद्धव ठाकरेंची जाहीर माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोणताही शिवसैनिक माता-भगिनींचा कधीही अपमान करणार नाही. मराठा मूकमोर्चाबाबत मुखपत्रात आलेल्या व्यंगचित्रामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माता-भगिनींची मनापासून माफी मागतो, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर मौन सोडत व्यंगचित्रावरून उठलेले वादळ शांत करण्यासाठी मराठा समाजाची माफी मागितली.सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यंगचित्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

उद्धव म्हणाले, व्यंगचित्रावरून शिवसेनेला धमक्या देण्याचा प्रयत्न झाला. परंतु आम्ही धमक्यांना घाबरत नाही आणि कोणापुढे नमणारही नाही. ५० वर्षात आमच्यावर अनेक संकटे आली; परंतु आम्ही सगळ्यांना पुरून उरलो आहोत. हिंदू, मराठ्यांची एकजूट सहजासहजी होत नाही. मात्र एकजूट होताना दिसत असल्याने त्याला आम्ही अपशकुन करणार नाही. जे आत्ता मराठ्यांबाबत बोलत आहेत त्यांच्याच कारभाराने नडलेली जनता एकत्र आली. मराठ्यांच्या भावनांशी खेळ नको म्हणून मराठा आरक्षणाबाबत या नेत्यांची वक्तव्ये ऑन रेकॉर्ड यावी यासाठीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घ्यावे, अशी मागणी केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, उद्धव ठाकरे म्हणाले, ...म्हणून मी माफी मागतो!
बातम्या आणखी आहेत...