आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांसाठी उद्धव भेटणार मुख्यमंत्र्यांना; पाेलिस पत्नींनी घेतली ‘माताेश्री’वर भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पोलिसांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. रविवारी निवृत्त पाेलिस आणि पोलिसांच्या कुटुंबीयांनी ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. शहीद विलास शिंदेंचे कुटुंबीयदेखील हजर होते.

वाहतूक पाेलिस विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी काय करता येईल याबाबत काही निवृत्त पोलिस कर्मचारी आणि पोलिस पत्नींनी रविवारी उद्धव ठाकरेंशी चर्चा करून अनेक मागण्या केल्या. यानंतर माध्यमांशी बाेलताना उद्धव म्हणाले, ‘पाेलिसांबाबत एखादी दुर्दैवी घटना घडली की उद्रेक होतो, मग प्रकरण पुन्हा शांत होते. अशा वेळी अनेक राजकारणी दुर्दैवी कुटंुबीयांची भेट घेऊन आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतात. मात्र मला तसे काहीही करायचे नाही. आज झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी अनेक मागण्यांबाबत माझ्याशी चर्चा केली. आता या प्रकरणाच्या पाठपुराव्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली अाहे.’

राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
शनिवारी पोलिस पत्नींनी राज ठाकरेंचीही भेट घेऊन व्यथा मांडल्या होत्या. राज यांनी या महिलांना १५ दिवस थांबण्याचे आवाहन केले आहे. आपण अगोदरच पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून ते काय निर्णय घेतात याची पुढील पंधरा दिवस आपण वाट पाहणार असल्याचे राज म्हणाले. आयुक्तांनी यावर काही ठोस उपाययोजना केल्यास पंधरा दिवसांनंतर आपण आपली भूमिका मांडणार असल्याचे राज यांनी जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...