आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या, 1 इंच तुकडाही तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पारदर्शकता काय ते भाजपने आम्हाला शिकवू नये. हिंमत असेल तर अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भांडुपमध्ये जाहीर सभेत ठणकावून सांगितले आहे. हुतात्मा चौकात थोतांड करून काय फायदा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे. 

दरम्यान, शनिवारी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला. भाजपने पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेवर निशाणाही साधला होता. यानंतर शिवसेनेनही भाजपवर शरसंधान साधले आहे. मुंबईकर असल्याचे काही जणांना सांगावे लागत आहे. शिवसैनिकांचे मुंबईशी रक्ताचे नाते असल्याचे उद्धव यांनी भांडूपमध्ये सांगितले.

25 वर्षे सापाला दूध पाजले- संजय राऊत
25 वर्षे सापाला दूध पाजत होतो. पण आता नाही. तुम्हाला आमच्या तालावर नाचावे लागेल, तुम्ही साप तर आम्ही गारुडी. भाजपचे 100 बाप उतरले तरी आम्ही उरुन पुरू, अशा शब्दात संजय राऊत यांनी भांडूप येथील सभेत वक्तव्य केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे...?
- महाराष्ट्राचा एक इंच तुकडाही तोडू देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही. आज जे हुतात्मा चौकात गेले होते ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का? असा सवाल उद्धव ठाकरे यांचा भाजपला केला आहे. 
- भांडुपमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार आहे. त्याचप्रमाणे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 
- वैतरणा धरण सर्वात जलद गतीने बांधले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कमी पडू दिले नाही. भाजपने आरोप जरूर करावे, मात्र, आधी स्वत:कडे बघावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 
- बंडारू लक्ष्मण एक लाख रुपयांची लाच घेत होते. इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेला
- पाच वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण बोलले होते , आता ‘ढुंडो ढुंडो रे साजना ‘ अशी त्यांची अवस्था झाली आहे.
- शिवसेनेच्या अंगावर याच, एकदाच काय तो फैसला होऊ द्या. 
- नोटाबंदी हे भाजपने लादलेले संकट.
-नोटबंदी फटक्यात लोक बेरोजगार झाले ,कोण देणार नोकरी ,कसे भरून निघणार नुकसान.  नोटाबंदीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला
- नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, काळा पैसा थांबला नाही.
- कोस्टल रोड आठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार ,स्वतःच्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा. 
- शाळकरी मुला-मुलींसाठी बेस्ट बसचा प्रवास मोफत करणार. 
- शिवसेनेचा रक्तदानाचा विक्रम कुणीही मोडला नाही.
- शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच योजना आणत आहे. 
- मुंबई महापालिकेत सत्ता आल्यानंतर मालमत्ता कर रद्द करणार.  
- मुंबई महापालिकेचं वीजनिर्मीती केंद्र कुणासाठी अडवलेय, ते मुख्यमंत्र्यांनी सांगावे. 
- मुंबई महापालिका स्वत:चे वीज निर्मिती केंद्र उभारणार
बातम्या आणखी आहेत...