आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'उडता पंजाब'चा वाद पोहोचला कोर्टात, चित्रपटातील १३ दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या १३ कटविरोधात "उडता पंजाब' चित्रपटाच्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच बोर्डाने सुचवलेल्या बदलाची प्रत आपल्याला मिळाली आहे. यावर अभ्यास केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला आव्हान द्यायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ, असेही दिग्दर्शक अनुराग कश्यपने स्पष्ट केले.
या प्रकरणी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलाबाबतची प्रत मिळाली आहे. शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला "उडता पंजाब' हा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यात शाहिदने ड्रग्जच्या आहारी गेलेल्या रॉकस्टारची भूमिका साकारली आहे. मात्र, चित्रपटात अनेक अाक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद असल्याचे सांगत सेन्सॉर बोर्डाच्या समितीने चित्रपटातील १३ दृश्यांना कात्री लावण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी राजकीय दबावाखाली येऊन चित्रपटाला कात्री लावली आहे. त्यामुळे आपण दक्षिण कोरियात राहत असल्यासारखे वाटते, असा आरोप कश्यप याने मंगळवारी केला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाला कात्री लावल्याची चर्चा आहे. याप्रकरणी गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.
राजकीय दबाव नाही : "उडता पंजाब' चित्रपटातील सुचवलेले बदल हे राजकीय दबावापोटी घेतले नाहीत, असे स्पष्टीकरण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिले आहे. कश्यप यांच्या आरोपाबाबत ते म्हणाले, माझ्याबद्दल कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नाही. चित्रपटात सुचवलेल्या बदलाबाबत आपण कश्यप यांना माहिती दिली होती. तसेच अधिकृत पत्रही घेऊन जाण्यास त्यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी ते स्वीकारले नसल्याचे निहलानी यांनी सांगितले.

बॉलीवूडचा पाठिंबा
सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या बदलाच्या निर्णयाविरोधात दिग्दर्शक महेश भट, करण जोहर, रामगोपाल वर्मा, मुकेश भट आणि इतर कलाकारांनी अनुराग कश्यप आणि चित्रपटाच्या निर्मात्याला पाठिंबा दर्शवला आहे.
बातम्या आणखी आहेत...