आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ujani's Water Released Within 24 Hours : High Court

उजनीत 24 तासांत पाणी सोडा : हायकोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उजनी धरणाच्या वरच्या भागातील पुणे विभागाच्या धरणांमधून उजनीत 24 तासांत पाणी सोडावे. यासंदर्भातील कार्यवाहीबद्दलची माहिती सोमवारी होणा-या सुनावणीदरम्यान सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. या निर्णयामुळे पाण्याविना त्रस्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे.


मागील तीन वर्षांपासून अपु-या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठी उणे वीस टक्क््यांपर्यंत पोहोचला आहे. त्याउलट, उजनीच्या वरील भागांतील 22 धरणांमधील पाणीसाठा मात्र 50 टक्क्यांहून अधिक आहे. या पाण्याचे सम प्रमाणात वितरण करून या धरणांतील पाणी उजनीमध्ये सोडण्यात यावे. जेणेकरून, दुष्काळामुळे होरपळणा-या सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकेल, अशी मागणी करणारी याचिका मोहोळ तालुका बहुउद्देशीय शेतकरी संघाच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.


पाणी उचलू नये यासाठी भारनियमनाच्या सूचना
पुणे विभागातील धरणांमधून पाणी सोडल्यास ते उजनीत पोहोचण्यासाठी सुमारे आठवडाभराचा कालावधी लागतो. या कालावधीत हे पाणी भीमा नदीकाठावरील गावांनी कृषीपंपांद्वारे उचलू नये व ते उजनी धरणात व्यवस्थितरित्या पोहोचावे, यासाठी संबंधित भागांमध्ये भारनियमनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या. यासंदर्भातील अहवाल सोमवारी होणा-या सुनावणीदरम्यान सादर करण्याचे आदेश न्यायालयाने या वेळी राज्य सरकारला दिले.


‘अजित पवारांना चपराक’
सोलापूरला पाणी देण्याचे आदेश मुंबई उच्च् न्यायालयाने दिल्याने सोलापूरचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धरणात मुतायची घाई झाली होती. मात्र, कोर्टाने त्यांची अडचण दूर केली आहे. आता त्यांना मुतायची गरज उरलेली नाही. त्यांना पुण्यातील धरणातून पाणी द्यावे लागेल. न्यायालयाच्या या निर्णयाने पवारांची मस्ती उतरल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.