आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्ष साखळदंडाने बांधुन ठेवण्यात आले हत्तीला, स्थिती पाहून तुमच्या डोळ्यात येतील अश्रु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साखळदंडाने हत्तीला बांधून ठेवण्यात आले होते. - Divya Marathi
साखळदंडाने हत्तीला बांधून ठेवण्यात आले होते.
मुंबई- वस्तू वाहण्यासाठी हत्तींचा अनेक वर्षापासून वापर केला जातो. पण जेव्हापासून वाहने आणि यंत्रे आली तेव्हापासून हत्तींना दात आणि चामड्यासाठी मारण्यात येऊ लागले. अनेक ठिकाणी माणूस हत्तीला आपल्या इशाऱ्यावर चालवतो. तर काही जण हत्तीला अतिशय वाईट स्थितीत ठेवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. तिथे हत्तीच्या मदतीसाठी परदेशी नागरिक पुढे आले. 
 
50 वर्षांपासून साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले होते या हत्तीला
- उत्तर प्रदेशात या हत्तीला 50 वर्षांपासून साखळदंडास बांधून ठेवण्यात आले होते. त्यावर बरेच अत्याचार करण्यात येत होते. याची माहिती इंग्लंडमध्ये काम करणाऱ्या एका संस्थेला समजली. त्यांनी भारतात येऊन याची दखल घेतली. हत्तीला तेथून मथूरेतील अॅनिमल केअर सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आले. हत्तीला ज्या स्थितीत ठेवले होते ते पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रु येतील. 
 
27 जणांकडे गुलाम म्हणून राहिला होता हत्ती
- 51 वर्षाच्या या हत्तीचे नाव राजू आहे. तो 27 व्यक्तींकडे गुलाम म्हणून राहिला. त्याला साखळदंडात बांधून ठेवण्यात येत होते. त्याच्यावर बचाव करण्याऱ्या टीमने 2 दिवस लक्ष ठेवले होते. त्याला वेळेवर खाण्यासही मिळत नव्हते आणि झोपही मिळत नव्हती. त्याच्याकडून फक्त काम करुन घेण्यावरच जोर देण्यात येत होता. भूकेमुळे तो प्लॅस्टिक आणि पेपरही खात होता. 
 
मध्यरात्री करण्यात आली सुटका
टीमने मध्यरात्रीच्या सुमारास राजूची सुटका केली. त्याला इतक्या जोराने साखळदंड बांधण्यात आले होते की त्याची त्वचाही कापू लागली होती. त्याला आता मथूरेत ठेवण्यात आले आहे. तेथे तो नीट झाला असून आनंदात आहे. ज्या दिवशी त्याची सुटका करण्यात आली त्याच दिवशी त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
 
पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...