आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘उमराव जान’ ची अदा पुन्हा रसिकांच्या भेटीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री रेखाने 1981 मध्ये ‘उमराव जान’ सारखा सुपरडुपर हिट चित्रपट दिला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग तयार करण्याची योजना या चित्रपटाचे दिग्दर्शक मुझफर अली आखत आहेत.
‘उमराव जान’ या चित्रपटाने 80 च्या दशकात अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. यामध्ये रेखाच्या सौंदर्याची भुरळ अनेकांना पडली. लखनऊ येथील एका वेश्येच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा होती. यामध्ये रेखाचा अभिनय हा एवढा दर्जेदार होता की, तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिल्यांदा राष्टÑीय पुरस्कार मिळाला. ‘उमराव जान’ हा चित्रपट 1905 मध्ये आलेल्या ‘उमराव जाँ ’अदा या कादंबरीवर आधारित होता. सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलची धडाक्यात तयारी सुरू आहे. तसेच अली यांच्यासोबत जावेद सिद्दीकी या चित्रपटाच्या पटकथेर काम करत आहेत. यामध्ये सध्या त्यांनी दोन वेगवेगळ्या कथा तयार केल्या आहेत. यातील ऐनवेळी एका कथेची निवड करण्यात येईल असे सिद्दीकी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. तसेच या सिक्वेलसाठी अद्याप कोणत्याही कलाकारांची निवड करण्यात आली नाही. मात्र, पटकथेवर अली यांनी निर्णय घेतल्यानंतर ही निवडदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन 2006 मध्ये ‘उमराव जान’ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र या चित्रपटाने चांगलीच आपटी खाल्ली. आता स्वत: मुझफर अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याने याबाबत उत्सुकता वाढली आहे.
खय्यामच्या दर्जेदार संगीताची भुरळ
‘उमराव जान’मध्ये खय्याम यांच्या मंत्रमुग्ध संगीताने अनेकांना घायाळ केले होते. या चित्रपटातील सर्वच गाणी ही सुपरडुपर हिट झाली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये याच प्रकारच्या संगीताची अपेक्षा आहे. मात्र, अली आता कोणता संगीतकार निवडतात हे पाहणे औसुक्याचे ठरेल.
छायाचित्रातून पाहा, \'उमराव जान\'चा खासदार रेखा पर्यंतचा प्रवास