आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उंच माझा झोका’चा 14 जुलैला समारोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ही मालिका रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित आहे’ असे मालिकेच्या सुरुवातीला सूचित करताना झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत रमाबाई यांच्या संपूर्ण आयुष्याचे चित्रण अपेक्षित असताना 14 जुलै रोजीच या मालिकेचा शेवट होत आहे.
बालविवाह आणि रमाबाई रानडे यांचे कार्यकर्तृत्व अशा मुख्य दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणारी ‘उंच माझा झोका’ ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. भरल्या घरातील महादेव गोविंद रानडे यांच्यासोबतचे रमाबार्इंचे वैवाहिक आयुष्य रंगवून दाखवल्यानंतर त्यांचे वैयक्तिक व स्वतंत्र आयुष्यही तितक्याच ताकदीने चित्रित केले जाईल, असे वाटत असतानाच 15 जुलैपासून एक नवी मालिका सुरू होत असल्याची जाहिरात सध्या झी मराठी वाहिनीवर दाखण्यात येत आहे. रमाबाई यांनी शिक्षणाची सुरुवात महादेव गोविंद रानडेंचे बोट धरून केली असली तरी महादेव रानडेंच्या निधनानंतर तब्बल 20 वर्षे जगलेल्या रमाबार्इंनी नंतरच्या आयुष्यात मुलींच्या शिक्षणाचा प्रसार वेगवेगळ्या पातळीवर केला. परित्यक्ता आणि विधवांना हक्काचे सेवासदन स्थापले. पती निधनानंतर केशवपन करण्याच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध लढायला स्वत:पासून सुरुवात केली. मालिकेत जवळपास 14 जून रोजी महादेव गोविंद रानडे यांचे निधन दाखवल्यानंतर 14 जुलैपर्यंत म्हणजेच अक्षरश: मोजक्या एपिसोड्समध्ये रमाबार्इंचे कार्य दाखवणार असल्याचे सूतोवाच चॅनलतर्फे करण्यात आले आहे. मालिकेचा शेवट होत असला तरी रमाबार्इंच्या कार्यातील सर्व टप्पे अधोरेखित करून 14 जुलैपर्यंत दाखवणार असल्याचे वीरेन प्रधान यांनी सांगितले.

प्रेक्षकांचा हिरमोड
ही मालिका 14 जुलैपर्यंत 432 भागांचा पल्ला गाठेल. यात कमीत कमी भागांत रमाबार्इंनी एकाकी, स्वतंत्रपणे निर्णय घेत हाती घेतलेले कार्य दाखवले जाणार असेल तर रमाबार्इंचे संपूर्ण कार्य जाणून घ्यायची इच्छा असणाºया प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे.