आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी परिसरात पुल कोसळून तीन मजूरांचा मृत्यू; एल अँड टीच्या तीन जणांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील अंधेरी परिसरात सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाचा काही भाग कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. एमएमआरडीएच्या वतीने सुरु असलेल्या या बांधकामात त्यांनी केलेल्या दुर्लक्ष्यामुळे हे बांधकाम कोसळल्याचा आरोप मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केला आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलिसांनी एल अँड टी कंपनीच्या तीन अधिका-यांना अटक केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रकरणी एमएमआरडीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन या घटनेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशा सुचना केल्या आहेत.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी तिथे काम करत असलेल्या तीन मजुरांचा त्यात मृत्यू झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोचले आणि त्यांनी ढिगार्‍याखालील जखमींना कुपर आणि देसाई हॉस्पिटलमध्ये हलविले.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला वेस्टर्न एक्स्प्रेसवे जोडण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने या पुलाचे बांधकाम सुरू आहे.