आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या IPS लेडीच्या लाईफवर बनली आहे फिल्म, अंडरवर्ल्डही भीतीने राहायचे दबकून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र केडरची पहिली महिला आयपीएस आहे मीरा बोरवणकर... - Divya Marathi
महाराष्ट्र केडरची पहिली महिला आयपीएस आहे मीरा बोरवणकर...

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला येत्या रविवारी 9 वर्षे पूर्ण होतील. या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडेला दहशतवादी अजमल आमीर कसाबला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी दिली होती. कसाबच्या फाशीची प्रक्रिया महाराष्ट्र केडरची पहिली आयपीएस ऑफिसर मीरा बोरवणकर यांच्या देखरेखीखाली झाली होती. 'लेडी सुपरकॉप' नावाने प्रसिद्ध राहिलेल्या मीरा नुकत्याच पोलिस सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. मीरा सध्या मुंबईत राहतात. मीरा यांच्या लाईफवर बॉलिवूडमध्ये फिल्म 'मर्दानी' बनली आहे. पिता होते आर्मीत....

 

- मीरा मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील राहणारी आहेत. त्या 1981 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे पती अभय बोरवणकर सुद्धा भारतीय प्रशासन सेवेत (IAS)  अधिकारी होते. आता त्यांनी नोकरी सोडून व्यापार करतात.
- मीराचे पिता ओ. पी. चड्ढा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (BSF) मध्ये होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्कामध्येच होते. या काळात मीरा यांचे दहावीपर्यंत शिक्षण फाजिल्कामध्ये झाले.  
- यानंतर 1971 मध्ये त्यांच्या वडिलांची बदली झाली. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण जालंधरमध्ये झाले. माजी आयपीएस किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेत मीरा भारतीय प्रशासन सेवेत रूजू झाल्या.

 

मुंबईतील माफिया राज संपविण्याचे केले काम-

 

- आयपीएस बनल्यानंतर मीरा यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक शहरात झाली. ज्यात मुंबईतील त्यांची कामगिरी चमकली. 
- मीराने माफिया राज संपविण्यासाठी महत्त्वाचा रोल निभावला. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन गॅंगच्या अनेक सदस्यांना बेड्या ठोकल्या.

 

जळगाव सेक्स स्कॅंडलनंतर आली होती चर्चेत-

 

- सन 1994 मध्ये जलगावमध्ये एक बडा सेक्स स्कॅंडल उघडकीस आले होते. ज्यात शालेय मुलीपासून ते कॉलेज तरूणींना वैश्या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले होते. 
- या स्कॅंडलचा खुलासा करण्यात मीराने महत्त्वाचा रोल निभावला. या घटनेनंतर मीरा संपूर्ण देशातील मीडियात चमकली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मीरा बोरवणकर यांचे निवडक फोटोज....

बातम्या आणखी आहेत...