आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसीनाच्या मृत्यूनंतर गुप्तचर संस्था सतर्क, दाऊद इब्राहिमचा पत्ता फेसबुकवर शोधणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मृत्यूनंतर गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत. दाऊद सध्या नेमका कुठे आहे, याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर नजर ठेवली जात आहे. गुप्तचर संस्थांनी दाऊदच्या कुटुंबीयांच्या फेसबुक अकाऊंटवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे. दाऊद मुंबईत 1993 ला झालेल्या बॉम्बस्फोटांचा मुख्य आरोपी आहे.
गुप्तचर संस्थांच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमची मुलगी महरुख, जावई जुनैद मियांदाद आणि कुटुंबांतील इतर सदस्यांच्या सोशल मीडियावरील हलचालीवंर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादची सुन असलेली दाऊदची मुलगी पती जुनैदसोबत लाहोरमध्ये राहाते. 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. सुत्रांच्या माहितीनुसार, महरुख फेसबुकवर अॅक्टिव्ह आहे. तिचा पती जुनैदनेही काही दिवसांपूर्वीच प्रोफाइल अपडेट केली आहे.
क्राइम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की दाऊदच्या कुटुंबातील सदस्य मुळनावा ऐवजी इतर नावांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह आहेत. ते सर्व आमच्या रडारवर आहेत. महरुखने जून 2010 मध्ये एक पोस्ट टाकली होती, त्यावरुन दाऊद कराचीत असल्याची माहिती मिळाली होती. त्या पोस्ट मध्ये लिहिले होते, 'कराचीत मम्मी, पापा आणि जुनैदसह सर्वांन मिस करत आहे.'
2010 पर्यंत दाऊदच्या कुटुंबातील सर्व सदस्य फेसबुकवर अॅक्टिव्ह होते. सर्वजण एकमेकांमध्ये फोटो आणि संदेशांची देवाण-घेवाण करीत होते. जेव्हा त्यातील काहींच्या प्रोफाइल्सही माध्यमांमध्ये चर्चा झाली त्यानंतर सर्वांनी प्रायव्हसी सेटींग्ज बदलल्या आणि एका आठवड्याच्या आत सर्वांनी फेसबुक प्रोफाइल्स डिलीट करुन टाकले.
एक वर्षानंतर जुनैद पुन्हा एकादा फेसबुकवर सक्रिय झाला. त्याने कुटुंबातील सदस्यांची काही छायाचित्रे डिलीट केली. दाऊदचा मुलगा मोइन देखील शांतच होता मात्र, मुलगी महरुख. जे नावाने पुन्हा सक्रिय झाली. मात्र, 2010 मध्ये केलेल्या चुकीतून धडा घेत तिने नंतर फक्त नवरा जुनैद आणि मुलाचा एक फोटो पोस्ट केला. त्याला 50 हून अधिक लाइक्स आणि काही कॉमेंट्स देखील मिळाल्या आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे दाऊद